भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट मैदानावर सुरू आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 338 धावांच्या प्रत्युत्तरात भारताने उत्तम सलामी केली होती, मात्र त्यानंतर भारतीय फलंदाज झटपट बाद झाल्याने सामन्यात ऑस्ट्रेलियाची पकड निर्माण झाली आहे. भारताचा दुसरा डाव 244 धावांवर संपला. या डावात भारताचे तब्बल 3 फलंदाज धावबाद झाले आहेत. धावबाद होण्याची सुरुवात झाली ती हनुमा विहारीच्या विकेटने.
भारताच्या डावातील 68 व्या शतकात नॅथन लायन गोलंदाजी करत होता. यावेळी विहारीने चेंडू मिडऑफकडे ढकलत एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या जॉस हेजलवूडने शानदार थ्रो करत विहिरीला धावबाद केले. विहारी 38 चेंडूत केवळ 4 धावा करुन बाद झाला. हेजलवूडने विहारीला धावबाद करताना केलेल्या थ्रोचे संपूर्ण क्रिकेट विश्वाकडून कौतुक केले जात आहे.
Don't take on the Hoff! ⚡@hcltech | #AUSvIND pic.twitter.com/eXFpRPuKiJ
— cricket.com.au (@cricketcomau) January 9, 2021
वाढदिवसाच्या दिवशी घेतली 300 वी विकेट –
हेजलवूडसाठी हा सामना खास ठरला आहे. त्याने विहारीला धावबाद करण्याआधी भारताच्या पहिल्या डावात शुक्रवारी(8 जानेवारी) सलामीवीर रोहित शर्माची देखील विकेट घेतली होती. विशेष म्हणजे रोहितची विकेट हेजलवुडची आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 300वी विकेट ठरली. महत्त्वाचे म्हणजे, शुक्रवारीहेजलवुडचा 30वा वाढदिवस होता. त्यामुळे रोहितच्या रुपात हेजलवुडला वाढदिवसाची विशेष भेट मिळाली.
भारत २४४ धावांवर सर्वबाद –
भारताचा पहिला डाव २४४ धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर हेजलवूडने २ विकेट्स आणि मिशेल स्टार्कने १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
AUS vs IND : रिषभ पंतनंतर टीम इंडियाला आणखीन एक धक्का, जडेजा मैदानाबाहेर
अरे पळा पळा…! टीम इंडियाचे ‘हे’ 3 पठ्ठे असे झाले रनआऊट, व्हिडिओ पाहून डोक्याला हात लावाल
अरे बापरे! ‘या’ भारतीय फलंदाजांनी कसोटीत खेळलेत १३ हजारपेक्षाही जास्त चेंडू, पुजाराचाही समावेश