भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या एका महिन्यापेक्षा जास्त काळापासून आऊट ऑफ ऍक्शन आहे. हार्दिकला ऑक्टोबर 2023च्या शेवटच्या आठवड्यात दुखापत झाली होती. अष्टपैलू त्यानंतर फिटनेसच्या कारणास्तव एकही सामना खेळला नाहीये. पण आता त्याच्या फिटनेसबाबत चांगले संकेत मिळत आहेत. हार्दिकने स्वतः हा व्हिडिओ शेअर केला आहे.
आयसीसी वनडे विश्वचषकात भारतीय संघ (Team India) मागच्या वर्षी उपविजेता ठरला. विश्वचषक स्पर्धते हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याची भूमिका भारतासाठी महत्वाची होती. पण पहिल्या चार सामन्यांनंतर अष्टपैलू दुखापतीच्या कारणास्तव विश्वचषकातून बाहेर पडला. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णा याला त्याचा बदली खेळाडू म्हणून घोषित केले गेले होते.
यावर्षी आयसीसी टी-20 विश्वचषक खेळला जाणार आहे. अद्याप टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले नाही, पण जुन महिन्यात ही स्पर्धा आयोजित होण्याची दाट शक्यता आहे. विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर हार्दिक पंड्या भारतीय संघात असणे महत्वाचे आहे. स्वतः पंड्या देखील विश्वचषकासाठी आपल्या फिटनेसवर काम करत आहे. व्हायरल व्हिडिओत हार्दिक जिममध्ये घाम काळताना दिसत आहे. त्याचसोबत व्हिडिओमध्ये आपला पाळीव कुत्रा आणि मुलगा अगस्त्य यांच्यासोबत तो खेळताना दिसतो. हा व्हिडओ समोर आल्यानंतर चाहत्यांना हार्दिकच्या पुनरागमनाची प्रतिक्षा लागली आहे.
दरम्यान, मागच्या काही महिन्यांपासून हार्दिकचा वारंवार भारताचा भावी टी-20 कर्णधार म्हणून ओल्लेख केला गेला आहे. 2022 टी-20 विश्वचषकानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-20 क्रिकेटमध्ये एकही सामना खेळला नाहीये. दिग्गजांच्या अनुपस्थितीत बहुतांश वेळा हार्दिकलाच संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. असे असले तरी, त्याच्या हार्दिक आगामी टी-20 विश्वचषकात संघाचा कर्णधार असेलच, याची कुठलीच ठोस माहिती समोर आली नाहीये.
भारतीय संघाला 11 जानेवारीपासून मायदेशात अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार रोहित शर्मा या मालिकेत कर्णधाराची भूमिका पुन्हा स्वीकारण्यासाठी तयार झाला आहे. अशात हार्दिककडे कर्णधार पद दिले जाणार की नाही, हा प्रश्न कायम आहे. माहितीनुसार टी-20 विश्वचषकात देखील रोहित भारताचे नेतृत्व करताना दिसू शकतो.
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाची एक विकेट घेऊन दीप्तीचा नवा विक्रम! बनली वनडेत ‘ही’ कामगिरी करणारी चौथी भारतीय खेळाडू
वानखेडेत फिबी लिचफिल्डने साकारले दुसरे वनडे शतक! पहिल्या विकेटसाठी भारताने केले 29 षटके गोलंदाजी