रविवारी (२८ मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड संघात पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर तिसरा आणि निर्णायक वनडे सामना झाला. हा सामना जिंकत वनडे मालिका खिशात घालण्यावर उभय संघांची नजर होती. तत्पुर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये नाणेफेक झाली. यावेळी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याच्या एका कृत्याने सर्वांचे लक्ष वेधले.
झाले असे की, नाणेफेकीसाठी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा संघनायक बटलर दोघेही उपस्थित होते. सामना रेफरींनी विराटच्या हातात नाणे दिले आणि नाणे हवेत उधळत त्याने हेड्स घेतले. परंतु नाण्याची टेल बाजू पडली आणि विराट पुन्हा एकदा नाणेफेकीत हारला. हे पाहून बटलरला हसू आवरले नाही आणि काही वेळ तो गालातल्या गालात हसू लागला.
यापुर्वी दुसऱ्या आणि पहिल्या वनडे सामन्यातही विराट नाणेफेकीत पराभूत झाला होता. त्यामुळे कदाचित बटलरला जास्त हसू आले असावे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने यावेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
Toss Update:
England have won the toss & elected to bowl against #TeamIndia in the third @Paytm #INDvENG ODI.
Follow the match 👉 https://t.co/wIhEfE5PDR pic.twitter.com/AxDtLzCB8T
— BCCI (@BCCI) March 28, 2021
भारत-इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका या दौऱ्यातील शेवटची मालिका आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ६६ धावांनी विजय मिळवत भारताने मालिकेची धुमधडाक्यात सुरुवात केली होती. मात्र इंग्लंडने ६ विकेट्सने दुसरा वनडे सामना जिंकत मालिका बरोबरीत आणली. त्यामुळे तिसरा आणि अखेरचा वनडे सामना अटीतटीचा होणार हे निश्चित आहे. अशात कोणता संघ हा चुरशीची लढत जिंकत वनडे मालिकेत बाजी मारतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सामना सुरू होताच विराटचे द्विशतक; ‘अशी’ कामगिरी करणारा बनला आठवा कर्णधार
अरेरे! विराटचा भिडू आंतरराष्ट्रीय पदापर्णात सपशेल फ्लॉप, पहिल्याच चेंडूवर झाला बोल्ड