---Advertisement---

नया है यह! लाईव्ह सामन्यात अंपायरिंग सोडून पंच करू लागले क्षेत्ररक्षण, झेल घेतानाचा फोटो व्हायरल

On: मंगळवार, जून 21, 2022 9:04 PM
Kumar-Dharmsena-Catch
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका श्रीलंकेमध्ये खेळली जात आहे. या मालिकेतील १९ जून रोजी झालेल्या तिसऱ्या सामन्यात श्रीलंकाने कुसल मेंडीसच्या ८७ तर सलामीवीर पाथुम निसांकाच्या १३७ धावांच्या खेळीच्या मदतीने ऑस्ट्रेलियाचा ६ गडी राखून पराभव केला. कोलंबो येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात पंच कुमार धर्मसेनाने काही असे कृत्य केले की ते पाहुन कोणालाच हसू आवरले नाही.

खरं तर, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसर्‍या एकदिवसीय सामन्यादरम्यान, एक घटना घडली जी सामन्यापेक्षा जास्त चर्चेत आली. घडले असे की, ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यान यष्टीरक्षक फलंदाज ऍलेक्स कॅरीने स्क्वेअर लेगच्या दिशेने एक शॉट मारला, जेथे पंच कुमार धर्मसेना उभे होते. धर्मसेना त्याक्षणी विसरले असावे की, ते सध्या एक खेळाडू नसून पंच आहेत. ऍलेक्स कॅरीने मारलेला तो चेंडू त्यांच्या दिशेने येत असल्याचे पाहून धर्मसेना दोन्ही हात जोडून झेल घेण्याच्या तयारीत होते आणि अगदी शेवटच्या क्षणी आपले हात तेथुन काढुन घेतले. त्यांनी हा झेल घेतला नसला तरी त्यांच्या हावभावांनी मात्र चाहत्यांना खळखळून हसवले.

https://twitter.com/cricketcomau/status/1538486108761509889?s=20&t=y6maqOQgOCYR35QDdsThQQ

धर्मसेनाच्या या हावभावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये धर्मसेनाने ज्या पद्धतीने झेल घेण्यासाठी हात जोडले होते, ते पाहता ते पंचगिरी सोडून झेल घेणार असे वाटत होते. मात्र अखेरच्या क्षणी त्यांनी चेंडू जाऊ दिला. कदाचित त्यांना तेव्हा अचानक आठवले असेल की, ते आता खेळाडू नाहीत तर पंच आहेत. धर्मसेनाच्या या मजेशीर कृतीची सोशल मीडियावर चाहते खूप चर्चा करत आहेत आणि त्यावर प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

https://twitter.com/Dinesh_BHU_2020/status/1538800939158896640?s=20&t=vA3gabSS9L66qCCwEwZ5pQ

पंच कुमार धर्मसेना यांच्यावर अनेक मीम्स बनवले जातात, जे पाहून चाहत्यांना हसू आवरत नाही. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत विजयी आणि पराभूत संघाच्या खेळाडूंचा धर्मसेनाने काढलेला सेल्फी चाहते विसरलेले नाहीत. मात्र आता सोशल मीडियावर आणखी एक मीम व्हायरल झाले आहे, ज्यात धर्मसेना पंचगिरी करताना झेल घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

https://twitter.com/sportsfan_cric/status/1538698840731430912?s=20&t=AMZtyH0z93qPfpLd2santw

दरम्यान, तिसर्‍या वनडेबद्दल बोलायचे झाले तर श्रीलंकेने हा सामना ६ विकेट्सने जिंकला. या मालिकेत श्रीलंकेच्या संघाने ऑस्ट्रेलिया संघावर २-१ अशी आघाडी घेतली आहे. चौथा वनडे हा कोलंबो येथे खेळला जात आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

मयंक अगरवाल ते निखत झरीन, फोटोंमध्ये पाहा कोणी कसा साजरा केला जागतिक योगा दिन

चोट तो बहाना है, सुनिल शेट्टी की लडकी को घुमाना है..! केएल राहुल होतोय ट्रोल

फलंदाजी नव्हे तर स्लिपमध्ये झेल पकडण्याचा सराव करतोय पुजारा, अजिंक्य रहाणे आहे कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---