पाकिस्तान क्रिकेट त्यांच्या खराब फिल्डींगमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता ते पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत. पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली गेली. यातील शेवटचा सामना रविवारी (१ फेब्रुवारी) खेळला गेला. यामधील मैदानावर घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
लाहोरच्या गद्दाफी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज कुपर कोनले बाद होता की नाही याच्या चर्चा सुरू आहेत. झाले असे की, १४व्या षटकात कुपर फलंदाजीसाठी आला असता पाकिस्तानचा फिरकीपटू मोहम्मद नवाजने चेंडू टाकला. तेव्हा कुपर पुढे येत शॉट मारण्याच्या प्रयत्नात होता, यामुळे तो बराच क्रिजच्या बाहेर आला होता. त्याचाच फायदा घेत पाकिस्तानचा विकेटकीपर ख्वाजा नफीने स्टम्पिंग केले आणि कुपर बाद झाला.
आता या विकेटचा व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये नफीने चेंडू एका हातात पकडला असून स्टम्पिंग मात्र दुसऱ्याच हाताने करत बेल्स उडवल्या. त्यामुळे चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. एका हातात चेंडू असल्यावर दुसऱ्या हाताने स्टम्पिंग केली तर खेळाडू बाद होतो का ते.
विकेटकीपरने पहिल्या प्रयत्नात चेंडू हातात नसलेल्या हाताने स्टम्पिंग केली होती, दुसऱ्या प्रयत्नात मात्र हातात चेंडू घेत स्पम्प उडविले. दुसऱ्या प्रयत्नावेळी कुपर क्रिजपाशी पोहोचला होता असे दिसते. त्याला बाद दिल्याने तो एकही धाव न करता परतला. सोशल मीडियावर कूपर बाद होता याला काही जण हे बरोबर असून काहींनी चुकीचे म्हटले आहे.
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी ६ विकेट्स गमावत २०७ धावसंख्या उभारली होती. यामध्ये बाबर आझम आणि सइम आयुब यांची अर्धशतके केली.
लक्ष्याचा पाठलाग करताना नवख्या ऑस्ट्रेलियाची सुरूवात अडखळत झाली. ते १६.५ षटकात सर्व विकेट्स गमावत ९६ धावसंख्या केली. ज्यामुळे पाकिस्तानने १११ अशा मोठ्या धावांनी विजय मिळवला. तसेच पाकिस्तानने या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकल्याने मालिका ३-० अशी जिंकली.






