नुकताच दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या पहिल्या कसोटीमधील झालेला डेव्हिड वॉर्नर आणि क्विंटॉन डीकॉक यांच्यातील वाद चांगलाच गाजला आहे.
हा वाद ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार वॉर्नर आणि दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज डीकॉक या दोघांनाही भारी पडला आहे.
आयसीसीने मॅच रेफरी आणि मैदानावरील पंच यांच्या अहवालावरून आयसीसीची आचारसंहिता लेव्हल 2 नुसार वॉर्नरला दंड म्हणून त्याच्या सामना शुल्कामध्ये ७५% कपात आणि त्याला तीन डिमेरिट पॉइंट्स ही दिले आहेत.
जर त्याला आणखी एक डिमेरिट पॉइंट मिळाला असता तर त्याच्यावर सामना बंदीचे संकट देखील ओढवले असते. वॉर्नरने आइसीसीने केलेली कारवाई मान्य केली असून त्याविरोधात तो कोणतेही अपील करणार नाही.
याबरोबरच डीकॉकवर आयसीसीची आचारसंहिता लेव्हल १ नुसार कारवाई झाली असून त्याला दंड म्हणून त्याच्या सामना शुल्कामध्ये २५% कपात आणि त्याला एक डिमेरिट पॉइंट्स मिळाला आहे.
या सर्व वादाचा एक विडीओ आधी प्रसिद्ध झाला होता. आता याचा दुसरा विडीओ समोर आला आहे.
EXCLUSIVE: Fresh footage of David Warner reacting ferociously to a taunt by Quinton de Kock. pic.twitter.com/l5Cp5Qz94U
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) March 7, 2018