कार्डीफ। भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आज, 7 जुलैला त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय खेळाडूंनी त्याला दिलेल्या खास शुभेच्छांचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
यात सध्या इंग्लंड दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंनी धोनीला वाढदिवसानिमित्त काही संदेश आणि शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या व्हिडिओच्या शेवटी धोनीची 3 वर्षांची मुलगी झीवा ही दिसते.
तिनेही या व्हिडिओतून ‘हॅपी बर्थडे पप्पा’ असे म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर केएल राहुलने शुभेच्छा देताना सांगितले की त्याला क्रिकेटच्या तिनही प्रकारातील पदार्पणाच्या कॅप धोनीकडून मिळाल्या आहेत आणि ते क्षण त्याच्यासाठी नेहमीच खास असतील.
तसेच सुरेश रैना म्हणाला की धोनीने आत्तापर्यंत आमच्या वाढदिवसाला खूप केक चेहऱ्याला लावला आहे. त्यामुळे आता आम्हीपण त्याला केकने नक्कीच आंघोळ घालणार आहोत.
याबरोबरच अन्य खेळाडूंनीही काही आठवणी सांगत धोनीला शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना विराट म्हणाला ‘तू या वयातही नेहेमीसारखाच जलद आणि फिट आहे. तूला हसताना आणि खेळाचा आनंद घेताना पाहुन चांगले वाटते. तूझ्याबरोबर खेळणे हा सन्मान आहे. माझ्या कायमच तूला शुभेच्छा असतील.’
Happy Birthday MS Dhoni https://t.co/l9ZsHLSpVC
— Pranali Kodre (@Pranali_k18) July 6, 2018
धोनीने त्याचा हा वाढदिवस 500 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळत साजरा केला. गुरुवारी 6 जुलैला कार्डीफ येथे पार पडलेला इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा टी20 सामना हा धोनीचा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना होता.
महत्त्वाच्या बातम्या:
-भारतीय संघातील हा खेळाडू आहे रैनाचा बॅटिंग गुरू
-तब्बल सहा महिन्यानंतर मोहम्मद शमीच्या आयुष्यात चांगली घटना
-असं काय झालं की २६व्या वर्षीच क्रिकेटपटूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बाय बाय