विंडिज विरूद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकत भारतीय संघाने मालिकाही 2-0 ने जिंकली. पण सध्या आॅक्टोबर हिटचा सामना सर्वच भारतीयांना करावा लागत आहे. त्यातून भारतीय संघातील खेळाडू कसे सुटतील.
विंडिजविरूद्धचा सामना संपल्यानंतर थकलेल्या भारतीय खेळाडूंनी ‘आइस बाथ’ घेतला. यावर बीसीसीआयने एक ट्विट करत व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
“खूप वेळ उन्हात खेळून थकलेल्या खेळाडूंना पुन्हा उर्जा मिळण्यासाठी काही खेळाडूंनी आइस बाथ घेतला.” असे बीसीसीआयने आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.
Behind the scenes: Recovery, the ice bath way
After a long, hot day on the field, how do some players recover and cool off? 🛁🛁
Find out here – https://t.co/wzOIDO5Acz – by @28anand pic.twitter.com/vjhXuYAOv2
— BCCI (@BCCI) October 14, 2018
“खूप उन झेलल्यानंतर शरीर थंंड होण्यासाठी खेळाडूंनी आइस बाथचा वापर केला आहे.” असे भारतीय संघाचे ट्रेनर शंकर बसू यांनी सांगितले.