---Advertisement---

Video: या छोट्या वसिम अक्रमची गोलंदाजी पाहून तूम्ही व्हाल थक्क!

On: गुरूवार, मार्च 1, 2018 2:15 PM
---Advertisement---

सध्या पाकिस्तामधील एका छोट्या मुलाचा विडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. या मुलाची गोलंदाजीची शैली पाकिस्तानचा महान गोलंदाज वसिम अक्रम सारखी असल्याने त्याने सोशल मिडीयाचे विश्व व्यापले आहे. 

वसिम अक्रमने कसोटीत १०४ सामन्यात ४१४ तर वनडेत ३५६ सामन्यात ५०२ विकेट्स  घेतल्या आहेत. 

फैजान रामजान नावाच्या एका व्यक्तीने हा विडीओ शेअर केला असून त्या विडीओला २४ तासात तब्बल १ लाख लोकांनी पाहिला आहे तर १८०० लोकांनी रिट्वीट केला आहे. 

फैजान रामजान आपल्या ट्वीटमध्ये वसीम अक्रम, रमीझ राजा, शाहीद आफ्रिदी आणि शोयब अख्तर यांना प्रश्न विचारतो. 

“मला हा विडीओ मिळाला आहे. या प्रतिभावान मुलाबद्दल मला माहीत नाही. परंतू वसीम अक्रम, रमीझ राजा, शाहीद आफ्रिदी आणि शोयब अख्तर तुम्हाला याबद्दल काय वाटते?” असे फैजान रामजान आपल्या ट्वीटमध्ये म्हणतो. 

वसीम अक्रमनेही याला उत्तर दिले आहे. 

“कुठे आहे हा मुलगा? आपल्या देशात अतिशय प्रतिभावान खेळाडू उदयाला येत आहेत, परंतु त्यांना योग्य संधी मिळत नाही.  यांच्यासाठी काहीतरी करायची गरज आहे.” असे अक्रम आपल्या ट्विटमध्ये म्हणतो. 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment