भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीची 3 वर्षांची मुलगी झिवा अनेकदा तिच्या व्हिडिओ, फोटोमुळे सोशल मिडियावर चर्चेत असते. तसेच अनेकदा चाहतेही तिचे फोटो काढत असतात.
त्यामुळे वैतागुन तिने एका पापाराझी फोटोग्राफरला फोटो काढू नका म्हणून बजावले आहे. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर वायरल झाला आहे.
यात ती जेवत असताना एक पापाराझी फोटोग्राफर तिचे फोटो काढत होता. त्यामुळे ती त्याला म्हणाली ‘नो फोटो’ म्हणजे फोटो काढू नका. तिची ही गोड ताकिद त्या फोटोग्राफरनेही हसत मान्य केली.
https://www.instagram.com/p/BjCzGpiDnwh/?hl=en&taken-by=_sakshisingh_r
झिवा लाडक्या सेलेब्रीटी किड्सपैकी एक असल्याने तिचे असे फोटो आणि व्हिडिओ वायरल होत असतात.
तसेच धोनीही अनेकदा झिवाबरोबरचे व्हिडिओ शेयर करत असतो. आयपीएलच्या दरम्यानचेही तिचे अनेक फोटो वायरल झाले आहेत.
तिचे इंस्टाग्रामवरही अकाउंट असून त्यावर अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर केले जातात.
महत्त्वाच्या बातम्या-
–IPL 2018: हैदराबाद दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात
–इतिहास घडणार, भारतीय खेळाडू देशाबाहेरील या लीगमध्ये खेळणार!
–आयपीएलमधील ४ खऱ्या आॅलराउंडरची नावे वाचून तुम्हाला धक्काच बसेल
–टाॅप ५- एकही शतक न करता या दिग्गजांनी केल्या आयपीएलमध्ये ४ हजार धावा
–शिखर धवनने हा विक्रम करत धोनीला टाकले मागे






