भारतीय उद्योजक आणि काही महिन्यापूर्वी लंडनमध्ये पलायन केलेले उद्योगपती विजय मल्ल्या यांची भारत- दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यान प्रेक्षकांनी हुर्यो उडवली.
विजय मल्ल्या सध्या इंग्लंडमध्ये असून भारताच्या प्रत्येक सामन्याला हजेरी लावत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी विराट कोहलीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावून भारतीय खेळाडूंना पेचात टाकले होते.
काल मल्ल्यांनी जॅक हॉब्स गेटमधून ओव्हल मैदानात प्रवेश केला. त्यावेळी काही भारतीय क्रिकेट पाठीराख्यांनी त्यांची चोर चोर म्हणून हुर्यो उडवली.
तर एका व्हिडिओ टिपत असणाऱ्या प्रेक्षकाने “वो देखो चोर जा रहा हैं” अशी टिपण्णी केली. विजय मल्ल्या यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता आपल्या आसनाकडे जाणे पसंत केले.