Loading...

व्हिडिओ: विजय शंकरचे दुखापतीनंतर धमाकेदार पुनरागमन; पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट

भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकरने 2019 विश्वचषकादरम्यान झालेल्या दुखापतीनंतर शुक्रवारी(9 ऑगस्ट) तमिळनाडू प्रीमीयर लीग स्पर्धेतून क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केले आहे.

Loading...

2019 विश्वचषकादरम्यान शंकरच्या पायाच्या अंगठ्याला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा चेंडू लागला होता. त्यामुळे त्याला पायाच्या अंगठ्याच्या दुखापतीमुळे या विश्वचषकातून बाहेर पडावे लागले होते. शंकरने या विश्वचषकात 2 विकेट घेतल्या होत्या आणि 58 धावा केल्या होत्या.

या दुखापतीनंतर शंकरने शुक्रवारी चेपॉक सुपर गिलीज संघाकडून टुटी पेट्रीयोट्स संघाविरुद्ध खेळताना तमिळनाडू प्रीमीयर लीगमध्येही पदार्पण केले. तसेच क्रिकेटच्या मैदानातही पुनरागमन केले आहे.

या सामन्यात शंकरला फलंदाजीत चमक दाखवता आली नाही. पण त्याने गोलंदाजी करताना दोन विकेट्स घेतल्या आणि चेपॉक संघाला 32 धावांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.

Loading...

विशेष म्हणजे त्याने त्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. या सामन्यात चेपॉकने टुटी पेट्रीयोट्स संघाला प्रथम फलंदाजी करताना विजयासाठी 128 धावांचे माफक अव्हान दिले होते.

पण या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टुटी पेट्रीयोट्स संघाला शंकरने डावाच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर फलंदाज आकाश सिवानला बाद करत मोठा धक्का दिला.

त्यानंतर टुटी पेट्रीयोट्सची सर्वात शेवटची व्ही अथिसायराज डेविडसनची विकेटही शंकरनेच घेतली. त्यामुळे टुटी पेट्रीयोट्सचा संघ 18.5 षटकात 95 धावांवर सर्वबाद झाला.

Loading...
Loading...

तत्पूर्वी शंकरने फलंदाजी करताना 7 चेंडूत 3 धावाच केल्या. चेपॉक संघाकडून प्रथम फलंदाजी करताना गोपिनाथने चांगली झुंज देत 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही. त्यामुळे चेपॉक संघ प्रथम फलंदाजी करताना 19.3 षटकात 127 धावांवर सर्वबाद झाला होता.

या विजयाबरोबरच चेपॉकचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. प्ले ऑफच्या सामन्यांना रविवारपासून सुरुवात होणार आहे. प्लेऑफमध्ये चेपॉकचा संघ आर अश्विन कर्णधार असलेल्या डिंडीगुल ड्रॅगन्सविरुद्ध क्वालिफायर 1 मध्ये खेळणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

भारत-दक्षिण आफ्रिकामध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यांच्या ठिकाणात बदल; पुण्यात होणार हा सामना

लॉर्ड्सवर होणाऱ्या दुसऱ्या ऍशेस सामन्यासाठी असा आहे १२ जणांचा इंग्लंड संघ

टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी असा आहे वेस्ट इंडीजचा संघ

You might also like
Loading...