भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंग 13 जुलैला लंडनमधे ब्रिटनच्या ली माखराम विरूद्ध कॉमनवेल्थ सुपर मिडलवेट पदकासाठी लढेल. हा मुकाबला लंडनमधील यॉर्क हाॅलमधे होणार आहे.
ली माखरामने आजपर्यंत 22 प्रोफेशनल सामने खेऴले आहेत. यातील 17 सामने जिंकण्यात त्याला यश आले आहे.
तर भारताचा बिजिंग आॅलिंपिक कांस्य पदक विजेत्या बाॅक्सर विजेंदरची प्रोफेशनल स्पर्धेतील कामगिरी वाखाणण्या जोगी राहीली आहे. त्याने आजपर्यंत खेळलेल्या दहा पैकी दहा सामन्यात विजय मिळवले आहेत.
सहा महिन्यापूर्वी विजेंदरने जयपूर येथे घानाचा बाॅक्सर अर्नेस्ट अमुजूला पराभूत केले होते. तर ली माखराम गेल्या वर्षी जूनमधे इंग्लिश मिडलवेट किताबासाठी शेवटचे खेळला होता. यात त्याला जॉय मुलेंडरकडून पराभव स्विकारावा लागला होता.
ली माखराम आणि विजेंदर दोघेही तोडीचे बॉक्सर असल्याने हा मुकाबला रंगतदार होणार यात काहीच शंका नाही.
विजेंदर सध्या मॅन्चेस्टर येथे या मुकाबल्याची तयारी करत आहे. विजेंदरने यापूर्वी ड्ब्लूबीओ आणि एशिया पॅसिफीक सुपर मिडलवेट पदके आपल्या नावे केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–राफेल नदालबद्दल कधीही न ऐकलेल्या या गोष्टी तुम्हाला नक्कीच माहीत करुन घ्यायला आवडेल
–विराट- धोनीपेक्षाही मोठा विक्रम आता मिताली राजच्या नावावर
–मिताली राजला मिळालेल्या सामनावीराच्या रकमेवरुन मोठे वाद!
–२४ तासांतच विराट कोहलीसाठी चार मोठ्या गोड बातम्या
–संपुर्ण यादी- बीसीसीआयचे २०१७-१८सालचे पुरस्कार घोषीत, कोहलीसह मंधाना, हरमनप्रीत कौरचाही होणार गौरव
–फिफा विश्वचषक २०१८- ओळख ब गटाची