प्रत्येकाच्या आयुष्यात असा क्षण येतो, ज्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. सध्या असंच काहीसं भारतीयांच्या बाबतीत आहे. त्यातल्या त्यात भारताच्या हरियाणा राज्यातील खांडरा गावातील लोकांमध्ये तर खूपच आनंदाचे वातावरण आहे. याचे कारण आहे, नीरज चोप्रा. भारतीय भालाफेकपटू नीरजने टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये शनिवारी (७ ऑगस्ट) भालाफेकीत सुवर्ण पदकाची कमाई करत इतिहास रचला. त्याच्या या विजयानंतर सर्वजण एकच जल्लोष करत आहेत.
नीरज चोप्रा हा हरियाणा राज्यातील खांडरा गावातील रहिवासी आहे. त्याच्या विजयानंतर त्याच्या गावातील लोकांना प्रचंड आनंद झाला असून आणि ते चक्क नाचत आहेत. यादरम्यानचा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Villagers Dancing After Neeraj Chopra Won Gold In Tokyo Olympics 2020)
ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत दिसते की, नीरजच्या गावात मोठी स्क्रीन लावली आहे. तसेच मोठ्या संख्येने तरुण त्याची स्पर्धा पाहत आहेत. नीरजने विजय मिळवल्यानंतर सर्वजण एकच जल्लोष करत बेभान होऊन नाचू लागले. त्यांना पाहून कोणीही स्वत: ला नाचण्यापासून रोखू शकणार नाही.
From Khandra Village, home of #NeerajChopra @WorldAthletics pic.twitter.com/6Kgz76qzJj
— Athletics Federation of India (@afiindia) August 7, 2021
या व्हिडिओला आतापर्यंत ३.८ हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच ७०० पेक्षाही अधिक रिट्विट्स मिळाले आहेत.
अशी केली ती ऐतिहासिक कामगिरी
पात्रता फेरीत ८६.६५ मीटर भालाफेक करून नीरज अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. अंतिम फेरीत तो दुसऱ्या स्थानावरून सुरुवात करत होता. त्याने आपल्या पहिल्या संधीमध्ये ८७.०३ मीटर भालाफेक करत आघाडी घेतली. दुसऱ्या संधीमध्ये त्याने आणखी सुधारणा करत ८७.५८ मीटर भाला फेकला. पहिल्या फेरीच्या तिसऱ्या आणि अखेरच्या संधीमध्ये तो ७६.७९ मीटरची फेक करू शकला.
अंतिम आठमध्ये देखील तो अव्वल भालाफेकपटू म्हणून सहभागी झाला. तो अखेरच्या तीन संधीमध्ये त्याची पहिली फेक चुकीची ठरवण्यात आली. मनासारखी फेक न झाल्याने अंतिम फेरीतील दुसऱ्या संधीत त्याने फॉल थ्रो केला. सहाव्या आणि अखेरच्या संधीमध्ये ८४.०२ मीटरचा भाला त्याने फेकला. मात्र, त्याची दुसरी ८७.५८ मीटरची फेक त्याला सुवर्णपदक मिळवून देण्यास पुरेशी होती.
नीरजविषयी थोडंसं
भारतीय लष्करात नायब सुभेदार असणाऱ्या नीरजने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ५vमेगा क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. त्याने आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई खेळ आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली आहेत. नीरज चोप्राने आपले भालाफेक कौशल्य सुधारण्यासाठी जर्मनीच्या बायोमेकॅनिक्स तज्ञ क्लाऊस बार्टोनिट्झ यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अभिमानास्पद! अभिनव बिंद्रानंतर ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा नीरज चोप्रा दुसराच भारतीय
-इतिहास घडला! भारताच्या नीरज चोप्राने मिळवले भालाफेकीत सुवर्णपदक