देशांतर्गत क्रिकेटमधील कर्नाटक संघाचा माजी कर्णधार विनय कुमारला आताही भारतीय संघात आणि आयपीएलमध्ये पुनरागमन करायचे आहे. कुमारच्या म्हणण्यानुसार, तो आताही तंदुरुस्त आहे आणि तो त्याच्या प्रदर्शनावरही खुश आहे. कुमारने स्पोर्टकीडाशी बोलताना या गोष्टीचा उल्लेख केला.Vinay Kumar Wants To Join Indian Team At The Age Of 36.
कुमार म्हणाला की, “मी नेहमी माझ्या पुनरागमनाची अपेक्षा करत असतो. मी ३६ वर्षांचा झालो आहे. पण माझ्यासाठी वय हे फक्त आकड्याप्रमाणे आहे. मी स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग्य दिनचर्येचा (रुटीन) वापर करतो. शिवाय माझी गोलंदाजी आणि फलंदाजीही खूप चांगली झाली आहे. मी एक प्रॅक्टीकल क्रिकेटपटू आहे.”
“१० वर्षे मी कर्नाटक संघाचा कर्णधार होतो. मला माहिती आहे की, कर्णधार आणि निवडकर्ते कशाप्रकारे काम करतात आणि मला अजिबात नाही वाटत की मी कमजोर पडेल. आशा आहे की, जेव्हाही आयपीएलची सुरुवात होईल तेव्हा मला खेळण्याची संधी दिली जाईल,” असे कुमार पुढे बोलताना म्हणाला.
कुमारने त्याच्या नेतृत्वाखाली २०१३-१४ आणि २०१४-१५मध्ये कर्नाटक संघाला कित्येक देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा जिंकून दिल्या आहेत. त्याने प्रथम श्रेणीत १३९ सामन्यात ३३११ धावा केल्या आहेत. तसेच, ५०४ विकेट्सही घेतल्या आहेत. यात त्याच्या ३२ धावा देत ८ विकेट्स घेण्याच्या सर्वोत्तम कामगिरीचा समावेश आहे.
भारतीय संघात कुमारने २०१०मध्ये पदार्पण केले होते. मात्र त्याला जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही. तरी त्याने ३ वर्षात ३१ वनडे सामने खेळत ३८ विकेट्स घेतल्या आहेत. तर, कसोटीत एका सामन्यात १ आणि टी२०त ९ सामन्यात १० विकेट्स घेतल्या आहेत. त्याने नोव्हेंबर २०१३मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा वनडे सामना खेळला होता. यावेळी त्याने ९ षटकात १०२ धावा देत केवळ एक विकेट घेतली होती. नंतर त्याला भारतीकडून खेळण्याची संधी मिळाली नाही.
तरी हे पाहणे रोमांचक ठरेल की, विनय कुमारला भविष्यात भारतीय संघाकडून पुनरागमन करण्याची संधी मिळेल का नाही.
ट्रेंडिंग घडामोडी-
मॅच पहायला आलेल्या मुलीवरच झालं पाॅंटिंगला प्रेम, पुढे अशी घडली खास लव्हस्टोरी
लॉकडाऊनमध्ये मुंबईकर अजिंक्य रहाणे व रोहित शर्माला मिळाली ‘बॅड न्यूज’
चेन्नई किंग्ज याच दिवशी ३ वर्षांपुर्वी खऱ्या अर्थाने मुंबई इंडियन्सच्या खूप मागे…






