भारताचा माजी मध्यमगती गोलंदाज विनय कुमार याच्या घरी छोट्या पाहुणीचे आगमन झाले आहे. हा ३८ वर्षीय क्रिकेटपटू बापमाणूस बनला आहे. त्याची पत्नी रिचा सिंग हिने एका निरोगी मुलीला जन्म दिला आहे. स्वत: विनय कुमारने त्याच्या सोशल मीडिया खात्यावरून चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. हे त्यांचे पहिलेच अपत्य आहे.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या विनय कुमारने (Vinay Kumar) ट्वीटर खात्यावरून त्याच्या पत्नी आणि नवजात मुलीसोबतचा (Baby Girl) फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले आहे की, ‘आज आम्हाला हे सांगण्यात खूप आनंद होतोय की, आमच्या आयुष्यात एक गोंडस मुलीचे आगमन झाले आहे. देवाने आम्हाला दिलेली हे सर्वात प्रेमळ भेट आहे.’
काही दिवसांपूर्वीच विनय कुमारने माहिती दिली होती की, त्याची पत्नी (Vinay Kumar Wife) गरोदर असून तो लवकरच बाप बनणार आहे.
Today we are very happy and thrilled to announce the arrival of our baby girl. The most precious gift from God ???????? #Welcometo23 #BabyGirl pic.twitter.com/9zzwxmBWRv
— Vinay Kumar R (@Vinay_Kumar_R) June 23, 2022
विनय कुमारची क्रिकेट कारकिर्द
विनय कुमार त्या भारतीय क्रिकेटपटूंपैकी एक आहे, ज्यांनी तिन्ही स्वरूपात भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. त्याने १ कसोटी सामना खेळला आहे, ज्यामध्ये १ विकेट घेतली आहे. हा एकमेव कसोटी सामना त्याने जानेवारी २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. तसेच त्याची वनडे कारकिर्द ३१ सामन्यांची राहिली आहे तर टी२० कारकिर्दीत फक्त ९ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्याने ३८ विकेट्स घेतल्या आहेत. टी२० क्रिकेटमध्ये तो १० विकेट्सच घेऊ शकला आहे.
आयपीएलमध्ये विनय कुमार सर्वात यशस्वी मुंबई इंडियन्स संघाचा भाग राहिला आहे. याबरोबरच त्याने आणखीन २ संघांचे प्रतिनिधित्त्व केले आहे. तो मुंबईव्यतिरिक्त कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळला आहे. आयपीएलमध्ये १०५ सामने खेळताना त्याने १०५ विकेट्स घेतल्या आहेत. मात्र गेल्या ४ वर्षांपासून तो आयपीएलमध्येही खेळताना दिसलेला नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हिटमॅन ठरणार विक्रमवीर! पहिल्या कसोटीत आफ्रिदीचा ‘हा’ विक्रम मोडित काढणार
कोहलीला खेळताना बघण्यासाठी पठ्ठ्याने थेट शाळेलाच मारली दांडी!, फोटो होतोय व्हायरल






