पॅरिस ऑलिम्पिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. महिला कुस्तीपटू विनेश फोगट फायनलसाठी अपात्र ठरली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं ट्वीट करून ही माहिती दिली.
विनेश फोगट 50 किलो वजनी गटात खेळते, मात्र फायनल सामन्यापूर्वी तिचं वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅमनं जास्त भरलं. याचाच अर्थ तिचं मेडल हुकलं आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, फोगट रौप्य पदकासाठीही पात्र होणार नाही. आता 50 किलोमध्ये फक्त सुवर्ण आणि कांस्यपदक विजेते असतील.
संपूर्ण ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या विनेश फोगटकडून सुवर्णपदकाच्या अपेक्षा होत्या. मात्र आता अपात्रतेनंतर तिचं मेडलचं स्वप्न भंगलं आहे. विनेश फोगट आज (7 ऑगस्ट) रात्री 12.30 वाजता अंतिम सामना खेळणार होती. अंतिम सामन्यात तिचा मुकाबला अमेरिकेच्या सारा ॲन हिल्डब्रँडशी होणार होता. मात्र आता ती या सामन्यात खेळू शकणार नाही.
नियमांनुसार, जर एखादा खेळाडू वजन मोजण्याच्या प्रक्रियेत भाग घेत नाही किंवा वजनाचे निकष पूर्ण करत नाही, तेव्हा त्याला किंवा तिला स्पर्धेतून बाहेर केलं जातं आणि रँकशिवाय शेवटचं स्थान दिलं जातं. भारतीय शिष्टमंडळानं फोगट हिला वजनाचे निकष पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्याची विनंती केली होती, परंतु ही विनंती फेटाळण्यात आली.
विनेशला स्पर्धेतून बाद केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट केलं आहे. मोदी म्हणाले, “विनेश, तू चॅम्पियन आहेस! तु भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहे. आजचं अपयश दुख:दायक आहे. मला वाटत असलेली निराशा मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. मला माहित आहे की, आव्हानांना सामोरं जाणे हा तुझा स्वभाव राहिला आहे. मजबुतीनं परत ये! आम्ही सर्व तुझ्यासाठी प्रार्थना करत आहोत. तु देशाचा अभिमान आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहे.”
आजचा धक्का दुखावला. माझी इच्छा आहे की मी अनुभवत असलेल्या निराशेची भावना शब्दांनी व्यक्त करावी.
त्याच वेळी, मला माहित आहे की तुम्ही लवचिकतेचे प्रतीक आहात. आव्हाने स्वीकारणे हा तुमचा नेहमीच स्वभाव राहिला आहे.
मजबूत परत या! आम्ही सर्व तुमच्यासाठी रुजत आहोत.
विनेश फोगटनं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 50 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमन हिला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला होता. यासह ती ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली होती.
हेही वाचा –
“मोदींचा विरोध केला, तरीही संधी मिळाली…”, विनेश फोगटच्या विजयावर कंगना रनौतची खोचक प्रतिक्रिया
ढोल-ताशांच्या गजरात…पुष्पवृष्टी उधळत.., दिल्ली विमानतळावर मनू भाकरचं जंगी स्वागत, पाहा VIDEO
आधी दुखापत, शस्त्रक्रिया आणि आंदोलन…पॅरिस ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास विनेश फोगटसाठी सोपा नव्हता