टोकियो ऑलिम्पिकमध्ये गेलेल्या भारतीय पथकातील सुवर्ण पदकाची प्रबळ दावेदार म्हणून सहभागी झालेली महिला कुस्तीपटू विनेश फोगट रिकाम्या हाताने मायदेशी परतणार आहे. विनेशला उपांत्यपूर्व फेरीत पराभूत करणारी बेलारूसची वनेसा कलाडझिंस्काया उपांत्य फेरीत पराभूत झाली. त्यामुळे, विनेशला आता कांस्य पदकासाठी होणार्या रेपचेज राउंडमध्ये सहभागी होता येणार नाही. सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये विनेश विनापदक माघारी परतेल. दोन्ही वेळी ती पदकाची मजबूत दावेदार होती.
विनेशचा अखेरच्या क्षणी पराभव
महिलांच्या ५३ किलो फ्रिस्टाईल कुस्ती प्रकारात पहिल्या मानांकित भारताच्या विनेश फोगटला पराभूत करत खळबळ उडवणाऱ्या बेलारूच्या वनेसा कलाडझिंस्कायाचे उपांत्य फेरीत विजयाची दावेदार मानले जात होते. मात्र, चीनच्या पॅंग किनाऊ हिने अटीतटीच्या सामन्यात वनेसाला २-२ अशा बरोबरीत सुटलेल्या सामन्यात तांत्रिक बाबींवर पराभूत केले. किनाऊने अखेरच्या २० सेकंदात दोन गुण घेत अंतिम सामन्यात जागा पटकावली.
उपांत्यपूर्व फेरीत पाहावा लागला होता पराभव
महिलांच्या ५३ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात विनेश फोगटला वनेसाने पराभूत केले होते. या सामन्यात वनेसाने विनेशला चितपट करून ‘विनर बाय फॉल’ अंतर्गत सामना खिशात घातलेला. कुस्तीच्या नियमानुसार जे दोन कुस्तीपटू अंतिम फेरीत प्रवेश करतात त्यांच्या विरोधी पराभूत खेळाडूंना आपापसात रेपचेज राउंडमध्ये खेळून कांस्य पदक मिळवण्याची संधी असते.
महत्त्वाच्या बातम्या –
चंदेरी यश! रवी कुमारच्या नावे ‘रौप्य’; भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळाले पाचवे मेडल
आयपीएलपूर्वी न्यूझीलंडचा संघ करणार बांगलादेश दौरा, असे आहे पूर्ण वेळापत्रक