मुंबई। मालाडमधील इनओरबीट मॉलमध्ये केलेल्या मारहाणी प्रकरणामुळे भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळी आणि त्याची पत्नी अॅन्ड्रीया संकटात सापडले आहेत.
ही घटना रविवारी घडली. या प्रकरणात बॉलिवूड गायक अंकीत तिवारीचे वडील राजेंद्र कुमार तिवारी आणि भाऊ अंकुर तिवारी सहभागी आहेत.
झाले असे की राजेंद्र कुमार तिवारी यांचा हात अॅन्ड्रीयाच्या हाताला लागला. ही गोष्ट राजेंद्र यांनी मुद्दाम केली असल्याचा आरोप करत कांबळीने त्यांना पंच मारला.
याविषयी अंकुर तिवारी याने सांगितले की त्यावेळी राजेंद्र हे त्यांच्या नातीला घेऊन गेम झोनमधून फुड कोर्टमध्ये येत होते.
तसेच त्याने सांगितले की जेव्हा तो याविषयी कांबळीशी बोलायला गेला तेव्हा कोणतीही गोष्ट ऐकण्याआधीच कांबळीने त्याला धक्का दिला आणि शिवीगाळ करायला सुरुवात केली.
या प्रकरणानंतर आता तिवारी कुटुंबाने कांबळी आणि त्याची पत्नी अॅन्ड्रीया विरोधात एफआयआर दाखल केला आहे. ही तक्रार बंगूर नगर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी सीनियर इंस्पेक्टर विजय बाने करत आहेत.
हा एफआयआर दाखल झाल्यानंतर कांबळीनेही क्रॉस एफआयआर करणार असल्याचे म्हटले आहे.
याआधीही कांबळी वेगवेगळ्या वादांमध्ये अडकला आहे. 2015मध्ये त्याच्या घरी काम करणाऱ्या बाईनेही कांबळी दांपत्याविरोधात एफआयआर दाखल केला होता.
त्यावेळी त्या बाईने वेतन देण्याची मागणी केल्यानंतर कांबळी दांपत्याने त्या बाईला मारहाण केल्याचा आणि एका खोलीत डांबून ठेवण्याचा आरोप केला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
–क्रिकेटला मिळाला पहिला १०० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणार खेळाडू
–भारताने पटकावले कबड्डी मास्टर्स स्पर्धेचं विजेतेपद, आंतरराष्ट्रीय कबड्डीत भारताचा दबदबा कायम
–आप की अदालत फेम रजत शर्मांची क्रिकेटमध्ये नविन इनिंग सुरु