---Advertisement---

पीएमडीटीए आयकॉन रोहित शिंदे टेनिस अकादमी स्पर्धेत अहान भट्टाचार्य, शर्विल गंगाखेडकर यांची आगेकूच

On: शनिवार, ऑक्टोबर 8, 2022 5:53 PM
---Advertisement---

रोहिल शिंदे टेनिस अकादमी व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए-आयकॉन रोहित शिंदे टेनिस अकादमी ब्रॉन्झ सिरिज 2022  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 8 ते 9 ऑक्टोबर 2022 या कालावधीत होणार आहे.

रोहित शिंदे टेनिस अकादमी, कर्वेनगर येथील टेनिस कोर्टवर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत 10वर्षाखालील मुलांच्या गटात पहिल्या फेरीत सातव्या मानांकित विश्वतेज देशमुखने विहान निजामपूरकरचा टायब्रेकमध्ये 5-4(8)असा संघर्षपूर्ण पराभव केला.शर्विल गंगाखेडकरने आरव मुदनूरला 5-3 असे पराभुत केले. 8 वर्षांखालील मुलांच्या गटात अहान भट्टाचार्य याने अर्णव योगीचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला.अयांश मुधोळकरने आदित्य उपाध्येवर 5-2 असा विजय मिळवला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:10 वर्षांखालील मुले: पहिली फेरी:

विश्वतेज देशमुख(7)वि.वि.विहान निजामपूरकर 5-4(8);
शितीझ प्रसाद (3)वि.वि.अरिजीत बावसकर 5-3;
कियांश बांबोळी वि.वि.इशान जोशी 5-3;
विराज खानविलकर वि.वि.अर्णव ओके 5-0;
विराज कुलकर्णी (6)वि.वि.ओम भांडे 5-3;
शर्विल गंगाखेडकर वि.वि.आरव मुदनूर 5-3;

आठ वर्षांखालील मुले:
अयांश मुधोळकर वि.वि.आदित्य उपाध्ये 5-2;
अर्जित बावसकर वि.वि.अर्जुन कौतिकवार 5-0;
कौटिल्य कुमार वि.वि.विवान गोयल 5-2;
अहान भट्टाचार्य वि.वि. अर्णव योगी 5-0.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
याला म्हणतात पावर! साधा सुधा नाही, पठ्ठ्याने थेट ‘एवढ्या’ मीटर लांबीचा मारलाय सिक्स, व्हिडिओ व्हायरल
काय रावं, धोनीची रांचीच टीम इंडियासाठी अनलकी! 8 वर्षांपासून जिंकली नाही एकही वनडे
धोनीचा चेन्नई दौरा गाजला, विमानतळावरील फोटो वेधत आहेत लक्ष

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---