भारतीय संघाला येत्या १८ ते २२ जून दरम्यान न्यूझीलंड संघाविरुद्ध विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. तसेच हा सामना झाल्यानंतर भारतीय संघ इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन हात करणार आहे. या दौऱ्यासाठी, शिखर धवनला संघात स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे तो सध्या घरीच आहे. अशातच त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो कविता म्हणताना दिसून येत आहे.
क्रिकेटच्या मैदानावर तुफान फटकेबाजी करणारा डाव्या हाताचा फलंदाज शिखर धवन हा सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव असतो. तो अनेकदा आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत असतो. तुम्ही अनेकदा त्याला गाणं गाताना किंवा डान्स करताना पाहिलं असेल. परंतु आता त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ज्यामध्ये तो कविता म्हणताना दिसून येत आहे.
त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो प्रेरणादायक कविता म्हणत आहे. त्याने या व्हिडिओ वर कॅप्शन देत लिहिले की, “रविवार हा शायरीसाठी असतो. ही अबरार काशीबजी यांची कविता आहे. जी माझ्या आवडत्या कवितांपैकी एक आहे.”
शिखर धवनचा हा शायराना अंदाज सर्वच चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. तसेच अनेक चाहत्यांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CPfygC5CUCu/
गेल्या काही दिवसांपूर्वी त्याने आणखी एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये त्याने म्हटले होते की, “घरी रहा नाहीतर गब्बर येईल..” तसेच त्याचा बासरी वाजवत असतानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्याने ‘होठों से छू लो तुम’ हे गीत वाजवले होते. या व्हिडिओ वर त्याने कॅप्शन देत, “आत्म्यासाठी संगीत. शांत रहा सकारात्मक रहा.” असे लिहिले होते.
https://www.instagram.com/tv/CPIaU-PJlZm/?utm_medium=copy_link
शिखर धवनला इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या संघात स्थान देण्यात आले नसले, तरी ही तो लवकरच भारतीय संघासाठी खेळताना दिसून येऊ शकतो. जुलै महिन्यात भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळायची आहे. या मालिकेत, शिखर धवन सलामी फलंदाजाची भूमिका बजवताना दिसून येऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
बासरीवादक नंतर शिखर धवन आता झाला शायर, व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल
आयपीएल २०२१: फलंदाजांना रहावे लागेल सतर्क, युएईतील मैदानं गाजवू शकतात ‘हे’ ५ गोलंदाज
तयारीस प्रारंभ! गांगुलीसह ‘हे’ अधिकारी दुबईत, उर्वरित आयपीएल आयोजनाबाबत करणार चर्चा