रविवारी (22जुलै) पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात वनडे मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्ताने झिम्बाब्वे 132 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानने झिम्बाब्वेला व्हाइटवॉश देत ही मालिका 5-0 अशा फरकाने जिंकली.
मात्र या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली चर्चेचा विषय ठरला.
या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानच्या हसन अलीने उत्साहाच्या भरात स्वत:ला जखमी करुन घेतले होते.
https://twitter.com/Iamrahul28/status/1018892961281708032
हसन अलीने दुसऱ्या सामन्याच्या 37 व्या षटकात पहिल्या चेंडूवर झिम्बाब्वेच्या रेयान मरेला बाद केले. त्यानंतर उत्साहाच्या भरात हसन अलीने जोरदार सेलिब्रेशन केले. मात्र हे करताना बेभान झालेल्या हसन अलीच्या मानेची शिर ताणली गेली. यावेळी हसन अली मोठी दुखापत होता होता थोडक्यात बचावला होता.
https://twitter.com/Iamrahul28/status/1021237724030881792
मात्र याच हसन अलीने रविवारच्या (22जुलै) सामन्यात सेलिब्रेशनचा मोह टाळत एक चालाखी केली. त्याने ज्या सेलिब्रेशनमुळे दुखापत झाली होती, ते सेलिब्रेशन करण्यासाठी आपला संघ सहकारी शादब खानला बोलावून त्याच्या शैलीत सेलिब्रेशन करायला सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
-इशांत शर्माने दाखवला आपल्या गोलंदाजांवर ठाम विश्वास
-एमएस धोनीची फॅमीली मेंबर करत आहे मुंबई इंडियन्ससाठी चिअर