---Advertisement---

कोण म्हणतं सचिन स्लेजिंग करत नाही? ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराला केले होते स्लेज, व्हिडिओ व्हायरल

On: शनिवार, ऑगस्ट 21, 2021 7:55 PM
---Advertisement---

सचिन तेंडुलकर हे असं नाव आहे ज्याला लोकं भारतात क्रिकेटचा देव असे म्हणतात. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी आजही त्याचे चाहते जगभरात आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सचिन ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव वाॅ याच्यासोबत स्लेजिंग करताना दिसत आहे.

जर सचिनच्या विक्रमांचा विचार केला तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात १०० शतके करणारा तो एकमात्र खेळाडू आहे. त्याचे चाहते त्याला नेहमीच शांत स्वभावाचा खेळाडू समजत आले आहेत. या गोष्टीत काही शंकाच नाही, कारण असा क्वचितच एखादा चाहता असेल, ज्याच्या हे लक्षात असेल की सचिनने त्याच्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत कोणासोबत स्लेजिंग किंवा गैरवर्तन केले आहे.

सध्या सोशल मीडियावर सचिनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सचिन त्याच्या त्या रूपात दिसत आहे, जे तुम्हाला  क्वचचितच पाहायला मिळाले असेल. त्याने नेहमीच त्याच्या विरोधकांच्या स्लेजिंगला आणि गैरवर्तनाला त्याच्या फलंदाजीने उत्तर दिलेले आपण पाहिले आहे. मात्र, या व्हिडिओत तो ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव वाॅ विरोधात चिडलेला दिसत आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात त्याचा संयम सुटलेला दिसत आहे. त्याने या व्हिडिओत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव वाॅला स्लेज केले आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहे की, सुरूवातीला तर सचिन ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव वाॅ वर नाराज झाला आहे. त्यानंतर सचिन गोलंदाजी करण्यासाठी येतो. त्याने फेकलेल्या चेंडूवर स्टीव लाॅंग-ऑनच्या दिशेने जोरदार फटका मारतो. त्याने मारलेला फटका आजीत आगरकरच्या हातात येतो आणि आजितने त्या चेंडूला अलगद झेलले आहे. व्हिडिओच्या शेवटी सचिन हासताना दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

शार्दुल ठाकुरचे ‘हे’ छुपे टॅलेंट पाहिले का? रोहित शर्माच्या मुलीसाठी गायले खास गाणे

आरसीबीने करारबद्ध केलेल्या सिंगापूरच्या ‘त्या’ फटकेबाजाची ‘ही’ आहे खासियत

हेडिंग्ले कसोटी पंत, विराट, रूट यांच्यासाठी ठरू शकते विक्रमी; ‘हे’ मोठे पराक्रम करण्याची आहे सुवर्णसंधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---