भारताचे माजी कर्णधार आणि कसोटी क्रिकेटमध्ये ६१९ बळी घेणारे अनिल कुंबळे पुन्हा एकदा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनू शकतात. कुंबळे २०१६ मध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले होते. मात्र, विराट कोहलीसोबत मतभेद झाल्याच्या बातम्या आल्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये पद सोडण्याचा निर्णय घेतलेला. भारतासाठी १३२ कसोटी सामने खेळणारा कुंबळे सध्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्सचा मुख्य प्रशिक्षक आहे. विराट आणि कुंबळे यांच्यात कदाचित मतभेद असतील, परंतु कोहलीने कुंबळे यांच्या प्रशिक्षकाखाली जबरदस्त कामगिरी केली होती.
अशी राहिली होती विराटची कामगिरी
कुंबळे भारतीय संघाचे प्रशिक्षक असताना विराटने १५ कसोटीच्या २६ डावांमध्ये १४६३ धावा केल्या होत्या. कर्णधार कोहलीने या काळात चार द्विशतकांसह पाच शतके केली होती. याशिवाय सलग चार कसोटी मालिकांमध्ये द्विशतक झळकावण्याचा पराक्रम भारतीय कर्णधाराने केला होता. विराटने वेस्ट इंडिज (२००), न्यूझीलंड (२११), इंग्लंड (२३५) आणि बांगलादेश (२०४) विरुद्ध द्विशतके केली होती. त्याचबरोबर वनडे सामन्यांमध्ये कोहलीने शानदार फॉर्म राखला होता. कुंबळे प्रशिक्षक असताना कोहलीने १८ वनडे सामन्यांमध्ये ३ शतके आणि ७ अर्धशतकांच्या मदतीने १०४५ धावा केल्या होत्या. यादरम्यान विराट सात वेळा नाबादही राहिला. एवढेच नाही तर कोहलीने कुंबळे यांच्या नेतृत्वाखालीच विदेशात पहिला कसोटी मालिका विजय मिळवला होता.
शतकाची वाट पाहत आहे विराट
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतके झळकावणारा कोहली गेल्या दोन वर्षांपासून शतक झळकावण्यासाठी झगडतो आहे. भारतीय कर्णधाराने ९६ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने २७ शतके केली असून, वनडेमध्ये कोहलीने भारतासाठी ४३ शतके केली आहेत. कोहलीने शेवटचे शतक २२ नोव्हेंबर २०१९ रोजी बांगलादेशविरुद्ध कोलकाता कसोटीत केले होते. तेव्हापासून त्याला ५४ डावांमध्ये शतक करता आले नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ पाच भारतीय फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर आयपीएलमध्ये पडलाय षटकारांचा पाऊस, सर्व दिग्गजांचा समावेश
जेव्हा केवळ २ धावांवर बाद होऊनही गांगुलीने जिंकलेला ‘सामनावीर’ पुरस्कार, पाकिस्तानची उडवली होती झोप
श्रीलंकेच्या ‘या’ दिग्गज क्रिकेटरने बीसीसीआय दिलेली प्रशिक्षक पदाची ऑफर धुडकावली