---Advertisement---

Photo: गोड गुफ्तगू!! नाणेफेकीवेळी धोनी अन् कोहलीचा ‘ब्रोमान्स’ ठरला लक्षवेधी, चाहतेही फिदा

On: शुक्रवार, सप्टेंबर 24, 2021 9:16 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ चा ३५ वा सामना शुक्रवारी (२४ सप्टेंबर) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात शारजाह येथे खेळला गेला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघ दुसऱ्या टप्प्यातील आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात होता. दुसरीकडे, एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज विजयाची मालिका कायम ठेऊन, गुणतालिकेत पुन्हा अव्वलस्थानी येण्यासाठी प्रयत्नशील दिसली. यादरम्यान सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीवेळी मैदानावर गहन चर्चा करताना दिसले.

दोन्ही संघ आज भिडणार आहेत, यादरम्यान सामना सुरू होण्यापूर्वी धोनी आणि कोहली चर्चा करतांना दिसले. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर विराटने धोनीच्या खांद्यावर हात टाकत मैदानावरच टेहळतांना दिसले. या सुंदर क्षणांचे फोटो वेगाने व्हायरल झाले. दोन्ही स्टार खेळाडूंच्या चाहत्यांनी यावर लाइक आणि कंमेंट्सचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे.

यापूर्वीही जेव्हा हे दोन्ही संघ आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात एकमेकांशी भिडले होते, तेव्हाही कोहली आणि धोनीमधील नात्याची बरीच चर्चा झाली होती.

https://twitter.com/SouravMsd/status/1441402445989507074?s=20

दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मानहानीकारक पराभव स्वीकारल्यानंतर विराटच्या संघाला जोरदार पुनरागमन करून विजयी मार्गावर परत यायचे आहे. आरसीबी सध्या आयपीएलच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. प्ले ऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आरसीबीला हा सामना जिंकणे आवश्यक आहे. कोलकाताविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात आरसीबीच्या फलंदाजासोबत गोलंदाजांनीही अत्यंत खराब कामगिरी केली होती.

तर दुसरीकडे, चेन्नईने आपल्या पहिल्या सामन्यात मुंबईचा २० धावांनी पराभव केला होता. चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो मराठमोळा ऋतुराज गायकवाड ठरला होता. ऋतुराजने झुंजार अर्धशतक झळकावत नाबाद ८८ धावा केल्या होत्या. चेन्नईचा संघ गुणतालिकेत १४ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

CSKvsRCB, Live: कोहली अन् पड्डीकलचे झंझावाती अर्धशतक, १११ धावांवर ब्रावोचा आरसीबीला पहिला धक्का

चेन्नईविरुद्ध कर्णधार विराटने दिली सिंगापूरच्या नव्या भिडूला संधी, वाचा आरसीबीच्या पदार्पणावीराबद्दल

व्यंकटेशमधील छुप्या सिताऱ्याला ‘त्या’ व्यक्तीने वयाच्या सातव्या महिन्यात ओळखले होते, आईचा खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---