सध्या ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषक स्पर्धा खेळली जात आहे. विश्वचषकानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियातून थेट न्यूझीलंडला जात मर्यादित षटकांच्या मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा सोमवारी (31 ऑक्टोबर) सायंकाळी करण्यात येईल. मात्र, त्याआधी भारतीय संघाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. या मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा व अनुभवी फलंदाज विराट कोहली यांनी विश्रांतीची मागणी केल्याचे समजतेय.
टी20 विश्वचषकानंतर अवघ्या चार दिवसात भारत व न्यूझीलंड टी20 मालिकेत आमने-सामने येथील. मागील विश्वचषकानंतर देखील अशाच प्रकारे न्यूझीलंडने भारताचा दौरा केला होता. भारतीय संघ या दौऱ्यावर तीन सामन्यांची टी20 व तीन सामन्यांची वनडे मालिका खेळेल. मात्र, या मालिकेसाठी रोहित शर्मा व विराट कोहली यांना विश्रांती दिली जाऊ शकते.
एका क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित व विराट यांनी या मालिकेसाठी विश्रांतीचे मागणी केलीये. भारताचे सर्वच वरिष्ठ खेळाडू आशिया चषकानंतर सातत्याने क्रिकेट खेळत आहेत. दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्धच्या मालिकांत तसेच विश्वचषकाचे सर्व खेळाडू सहभागी झालेत. त्यामुळे या मालिकेत त्यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यातही येऊ शकतो.
उभय संघांमध्ये प्रथम टी20 मालिका खेळली जाईल. 18 नोव्हेंबर रोजी वेलिंग्टन येथे मालिकेला प्रारंभ होईल. त्यानंतर 20 व 22 ऑक्टोबरला इतर दोन सामने खेळले जातील. हे सामने अनुक्रमे माउंट मान्गुई व नेपियर येथे होतील. त्यानंतर 25 ऑक्टोबर रोजी वनडे मालिकेला सुरुवात होईल. या मालिकेतील पहिला सामना ऑकलंड येथे खेळला जाणार आहे. त्यानंतर 27 व 30 नोव्हेंबर रोजी हॅमिल्टन व ख्राईस्टचर्च येथे उर्वरित दोन सामने खेळले जातील. नवीन वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंड संघ पुन्हा एकदा भारताचा दौरा करेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: आयर्लंडच्या गोलंदाजाविरुद्ध मार्शचा धोबीपछाड षटकार; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘बापरे!’
रिषभ पंतने ओपनिंग केल्यानंतर बदलणार भारताचे नशीब; असं आम्ही नाही, तर पठ्ठ्याचा चाहताच म्हणतोय