विराट कोहलीच्या भारतीय संघाने खेळाडूंच्या वर्षभराच्या कराराचे पैसे बीसीसीआईकडे वाढवून मागितले आहेत. नुकतीच भारतीय खेळाडूंच्या वार्षिक मानधनात वाढ करण्यात आली होती. गेल्याच आठवड्यात बीसीसीआयने अ श्रेणीत असणाऱ्या खेळाडूंचं वार्षिक मानधन २ कोटी एवढं केलं होत तर ब आणि क श्रेणीतील खेळाडूंचं मानधन अनुक्रमे १ कोटी व ५० लक्ष एवढे करण्यात आले होते.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी अशी मागणे केली आहे की अ श्रेणीच ५ कोटी , ब श्रेणीच ३ कोटी तर क श्रेणीच १.५ कोटी मानधन एका वर्षासाठी करावे. ही मागणी भारताच्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिका विजयानंतर लगेच करण्यात आली होती. विराट कोहलीने लक्षात आणून दिले की बाकीच्या देशांपेक्षा भारतीय खेळाडूंना कमी मानधन देण्यात येत आहे आणि त्यानंतर कोहलीने काही खेळाडूंशी चर्चा करून लगेच हे मागणी केली.
१ वर्षाच्या करारासाठी मिळणाऱ्या मानधनामध्ये भारत हा सर्वाधिक पैसे देणारा चौथा देश आहे , भारता आधी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा नंबर लागतो . सामान्यांचं मानधन व वर्षाचा करार दोन्ही मिळून या देशातील खेळाडूंना १० कोटीच्या जवळपास मानधन मिळते.