विराट कोहली याने आशिया चषक 2022 स्पर्धेत शतक केले. त्याने या स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 सामन्यात शतकाचा दुष्काळ संपवला. या शतकीय खेळीनंतर फॉरममध्ये परत आल्याचे त्याने सर्वांना संकेत दिले होते. नुकत्याच पार पडलेल्या बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत देखील त्याने शतक केले आणि वनडे फॉरमॅटमधील शतकाचा दुष्काळ देखील संपवला. कसोटी फॉरमॅटमध्ये मात्र मागच्या तीन वर्षांमध्ये विराट एकही शतक करू शकला नाहीये. आता त्याला कसोटी शतकाचा दुष्काळ संपवण्यासाठी पुढचे वर्ष पाहावे लागणार आहे.
सध्या भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे आणि उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने 188 धावांनी जिंकला. उभय संघांतील दुसरा कसोटी सामना 22 डिसेंबर रोजी मिरपूरमध्ये सुरू झाला. विराटने या सामन्यातील दुसऱ्या डावात शनिवारी (24 डिसेंबर) अवघी एक धाव करून विकेट गमावसी. 2022 मधील ही त्याची शेवटची खेळी होती. या सामन्यात जर त्याने शतक केले असते, तर त्याचा कसोटी फॉरमॅटमधील शतकाचा दुष्काळ देखील संपला असता. पण हे शक्य झाले नाही. आता यावर्षी भारतीय संघाला एकही सामना खेळायचा नाहीये.
विराटने त्याचे शेवटचे कसोटी शतक 23 डिसेंबर 2019 रोजी बांगलादेशविरुद्ध केले होते. हा सामना कोलकाताच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला होता. विराटने या सामन्यात 136 धावांची खेळी केली होती. पण तेव्हापासून मागच्या तीन वर्षांमध्ये त्याने एकही कसोटी शतक केले नाहीये. 2020, 2021 आणि 2022 मध्ये त्याने एकही कसोटी शतक केले नाहीये. एवढेच नाही, यादरम्यानच्या काळात विराट 80 धावांपेक्षा मोठी खेली देखील करू शकला नाहीये. 2020 मध्ये कोरोना महामारीमुळे त्याला फक्त तीन कसोटी सामने खेळता आले, ज्यामध्ये 19.33 च्या सरासरीने 116 धावा केल्या. 2021 मध्ये त्याने 11 कसोटी सामन्यांमध्ये 28.21 च्या सरासरीने 536 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याच्या चार अर्धशतकांचा समावेश होता.
बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर भारताला मायदेशात श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिका खेळायची आहे. विराटने 2022 मध्ये एकूण 6 कसोटी सामने खेळले आणि यामध्ये त्याने 11 डावांमध्ये एकूण 265 धावा केल्या. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 79 धावा राहिली आहे आणि सरासरी 26.50 होती. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध केपटाउन कसोटी सामन्यात ही खेळी केली होती. 2022 मधील ही त्याची पहिली खेळी होती आणि हे वर्ष त्याच्यासाठी खास असेल, असे सर्वांना वाटले होते. प्रत्यक्षात मात्र घडले काही वेगळेच. विराट या अर्धशतकानंतर वर्षातील पुढच्या 10 कसोटी डावांमध्ये एकही अर्धशतक करू शकला नाही. (Virat Kohli hasn’t been able to score a Test century for three consecutive years)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चार सामन्यात 4 वेगवेगळ्या सलामी जोड्या, भारतीय संघातील प्रयोगाला पूर्णविराम लागणार तरी कधी?
आहा कडकच ना! ईशान किशनच्या द्विशतकावर गर्लफ्रेंडही फिदा, पोस्ट वेधतेय सर्वांचे लक्ष