भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली वनडे विश्वचषक 2023 मध्ये संघासाठी महत्वाचा खेळाडू ठरला. मागचे वर्ष भारतीय संघाच्या दमदार प्रदर्शनासाठी सर्वांच्याच लक्षात राहिली. पण वनडे विश्वचषकात संघाला विजेतेपद न मिळाल्यामुळे चाहते नाराज देखील झाले. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केल्यानंतर कोट्यावधी भारतीयांप्रमाणेच विराट कोहली याच्याही मनाला ठेच पोहोचली होती. आता विराटला विश्वचषकादरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओत विराट अंतिम सामन्यातील पराभवानंतर चांगलाच निराश दिसत आहे.
वनडे विश्वचषक 2023 (ODI Wprld Cup 2023) मध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील भारतीय संघ एकही पराभव न स्वीकारता अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला. पण स्पर्धेची सुरुवात अपेक्षित पद्धतीने न करू शकलेल्या ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात बाजी मारली. अंतिम सामन्यातील ऑस्ट्रेलियाचा विजय भारतीय चाहत्यांना धक्का देणारा ठरला. विजयानंतर ऑस्ट्रेलियन संघ मैदानात जल्लोष करत होता. पण व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या बरोबर मागच्या बाजूला विराट कोहली (Virat Kohli) दिसत आहे. हा पराभवानंतर विराटच्या मनला होणाऱ्या वेदना या व्हिडिओतून समजू शकतात. चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत.
ऑस्ट्रेलियन संघ एकिकडे आपल्या सहाव्या विश्वचषक विजयाचा आनंद साजरा करत आहेत. तर त्यांच्याच मागे भारतीय दिग्गज विराट कोहली मान खाली घालून चालला आहे. विराट स्टंपजवळ येते आणि डोक्यातील टोपी हातात घेऊन स्टंपच्या बेल्स खाली पाडतो. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला 6 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. 2011 नंतर भारताकडे पहिल्यांदाच विश्वचषक जिंकण्याची सुवर्ण संधी आली होती. पण संघाला ही संधी साधता आली नाही.
UNSEEN VIDEO OF KOHLI 💔 pic.twitter.com/o4ZkZhf3zh
— cricket videos (@RizwanStum60450) January 1, 2024
दरम्यान, विराटच्या नाराजीचे एक अजून कारण असेही आहे की, स्वतः त्याने विजेतेपदासाठी जबरदस्त मेहनत घेतली होती. विराटने या विश्वचषक हंगामातील 11 डावांमध्ये सर्वाधिक 765 धावा केल्या. एका विश्वचषक हंगामात सर्वाधिक धावाचा विक्रम याआधी सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने वनडे विश्वचषक 2003 मध्ये सर्वाधिक 673 धावा केल्या होत्या. मात्र, विराटने मागच्या वर्षी सचिनचा हा विक्रम मोडीत काढला.
महत्वाच्या बातम्या –
David Warner Retired । वॉर्नर निवृत्तीनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार? जाणून घ्या दिग्गजाचा प्लॅन
दिग्गजाने 2023 चा ‘ब्रेकआउट परफॉर्मर’ म्हणून केली गिलची निवड, कौतुक करत सांगितली मोठी गोष्ट