भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडविरुद्ध आपला पुढचा कसोटी सामना 15 फेब्रुवारी रोजी राजकोटमध्ये सुरू करायचा आहे. याआधी शनिवारी (10 फेब्रुवारी ) बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. पण चाहत्यांपुठे आता प्लेइंग इलेव्हनबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळत नाहीये. विराटने सुरुवातील मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून माघार घेतली. त्यानंतर शनिवारी (10 फेब्रुवारी) शेवटच्या तीन सामन्यांसाठी संघ घोषित झाल्यानंतर समजले की, विराट उर्वरित सामन्यांमध्येही खेळत नाहीये. त्याचसोबत श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) देखील शेवटच्या तीन सामन्यांसाठी उपलब्ध नाहीये. अय्यरला विशाखापट्टणम कसोटीदरम्यान दुखापत झाली होती. रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि केएल राहुल (KL Rahul) यांचे मात्र संघात पुनरागमन झाले आहे. पण प्लेइंग इलेव्हनमध्ये त्यांची निवड फिटनेसच्या आधारावर केली जाईल.
This is the FIRST time Virat Kohli is going to miss an entire Test series during his career.#INDvENG pic.twitter.com/5gdASL5mJg
— Kausthub Gudipati (@kaustats) February 10, 2024
सरफराजला कसोटी पदार्पणाची संधी मिळणार?
राजकोटमध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघ वेगळ्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरेल. श्रेयस अय्यर याच्या जागी चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हे पाहावे लागेल. बीसीसीआयच्या मेडिकल टीमने केएल राहुलला खेळण्यासाठी फिट घोषित केले, तर अय्यरच्या जागी राहुल खेळताना दिसले. पण राहुल फिट नेसल, तर युवा सरफराज खान कसोटी पदार्पण करताना दिसू शकतो.
रविंद्र जडेजाच्या पुनरागमनावर देखील चाहत्यांचे लक्ष आहे. जडेजाने फिटनेस चाचणी पार केली, तर श्रेयस अय्यर किंवा कुलदीप यादव यांपैकी एकाचा संघातून पत्ता कट होऊ शकतो. अक्षर पटेलची गोलंदाजी पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये अपेक्षित नव्हती. पण फलंदाजीत त्याने महत्वपूर्ण योगदान दिले. तसेच कुलदीप यादवला दुसऱ्या कसोटीसाठी संधी दिली गेली होती. कुलदीपने इंग्लिश फलंदाजांपुढे आव्हान उभे केले आणि एखूण चार विकेट्स या सामन्यात घेतल्या.
संघात तिसरा बदल वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याच्या रुपात पाहायला मिळू शकतो. मोहम्मद सिराज याला दुसऱ्या कसोटीसाठी आराम दिला गोला होता. त्याच्या जागी मुकेश दुसऱ्या कसोटीत खेळला. पण अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. त्याने या सामन्यात अवघी एक विकेट घेतली. अशात राजकोट कसोटीतून त्याला वगळले जाऊ शकते. नुकत्याच अशा काही बातम्याही समोर आल्या होत्या की, जसप्रीत बुमराह याला तिसऱ्या कसोटीत आराम दिला जाऊ शकतो. पण सध्या भाताला कसोटी मालिकते आघाडी घ्यायची आहे. अशात कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापन बुमराहला विश्रांती देण्याच्या भानगडीत पडतील, असे वाटत नाही. (Virat-Iyer out, Rahul-Jadeja’s fitness will determine the playing eleven; These players are contenders for the final 11)
राजकोट कसोटीसाठी भारतीय संघावित प्लेइंग इलेव्हन –
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, रविंद्र जडेजा, केएस भरत, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
इंग्लंडविरुद्ध शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन अश्विन, रविंद्र जडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप
इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील 2 सामने झाले आहेत. आता उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघ आणि इंग्लंड संघ यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळेल. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारी रोजी राजकोट येथे सुरु होईल. त्यानंतर रांचीमध्ये 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी पर्यंत चौथा कसोटी सामना होईल. तर पाचवा आणि अंतिम कसोटी सामना धरमशाला येथील मैदानावर 07 मार्च रोजी सुरु होईल.
महत्वाच्या बातम्या –
IND vs ENG । ‘काहीच अडचण नाही, मी पण…’, विराटला सपोर्ट करताना डेल स्टेनने सांगितला स्वतःचा किस्सा
India First Test Match Win : 72 वर्षांपूर्वी, भारताने पहिली ऐतिहासिक कसोटी जिंकली, विनू मांकड यांनी ब्रिटिशांना दिलेला धक्का