बुधवारी (०९ फेब्रुवारी) अहमदाबाद येथे पार पडलेल्या भारत आणि वेस्ट इंडीज (IND vs WI) यांच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat kohli) केवळ १८ धावा केल्या. ओडियन स्मिथ याच्या चेंडूवर तो बाद झाला. विराट कोहलीचा हा त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील २५९ वा सामना आणि २५० वा डाव होता. या सामन्यादरम्यान कोहली २५० वनडे डावात सर्वात जास्त चौकार आणि षटकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याऱ्यांच्या यादीत सुद्धा माजी कर्णधार प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे.
विराट कोहलीने आत्तापर्यंत २५९ एकदिवसीय सामन्यांच्या २५० डावात १२३११ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ११५३ चौकारांचा आणि १२५ षटकारांचा समावेश आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग आहे. सेहवागने २४५ डावात चौकार आणि षटकार मिळून एकूण १२६८ बाउंड्री मारल्या आहेत. तसेच या यादीत तिसऱ्या क्रमांकावर क्रिस गेल आहे. त्याने एकूण ११६७ चौकार आणि षटकार लगावले आहेत. एडम गिलक्रिस्ट या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. गांगुलीने ११०९ चौकार
आणि षटकार लगावले आहेत. तो या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.
एकदिवसीय क्रिकेटच्या २५० डावात विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. कोहलीने १२,३११ धावा केल्या आहेत. तसेच गांगुली या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने ९६०९ धावा केल्या आहेत. या यादीत तिसऱ्या स्थानावर सचिन तेंडूलकर याचे नाव आहे. त्याने २५० डावात ९६०७ धावा केल्या आहेत. लारा या यादीत चौथा क्रमांकावर असुन त्याने ९३५४ धावा केल्या आहेत. महेंद्रसिंग धोनी या यादीत पाचव्या क्रमांकावर असुन त्याने ९३३८ धावा केल्या आहेत.
तसेच विराट कोहलीने आपल्या कारकीर्दीतील सर्वात जास्त धावा वेस्ट इंडीज संघाविरुद्धच ठोकल्या आहेत. त्यानंतर त्याने श्रीलंका, ऑस्टेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. वेस्ट इंडीज आणि भारतातील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना शुक्रवारी (११ फेब्रुवारी) अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतात जन्मलो असतो, तर कधीही राष्ट्रीय संघाकडून खेळू शकलो नसतो; असे का म्हणाला डिविलियर्स?
“साहा, तू बेस्टच आहेस, पण संघातील राजकारणाला बळी पडलास”, माजी क्रिकेटरची आगपाखड
‘मैं फिल्ड सेट करूंगा, तो पता लागूगा’, रोहितचं कौतुक करताना पंजाब किंग्जचा राहुलला अप्रत्यक्ष टोला