पल्लेकेल: भारतीय क्रिकेट संघाने आज श्रीलंका संघाला कसोटी मालिकेत व्हाईट वॉश देताना ३-० अशी पराभवाची धूळ चारली. भारतीय संघाने परदेशात प्रथमच एखाद्या संघाला ३-० असे कसोटी मालिकेत पराभूत केले आहे.
याबरोबर विराटने एका खास विक्रमला गवसणी घातली आहे. परदेशात व्हाइट वॉश देणारा (कमीतकमी ३ कसोटी )विराट कोहली हा दुसरा सर्वात तरुण कर्णधार आहे. त्याने अशी कामगिरी २८ वर्ष आणि २८२ दिवसांचा असताना केली आहे.
यापूर्वी इंग्लंडच्या टेड डेक्स्टरने २७ वर्ष आणि ३०८ दिवसांचा असताना न्युझीलंड संघाला १९६३ साली व्हाइट वॉश दिला होता.