सोशल मिडिया हे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सध्याचे एक मोठे माध्यम बनले आहे आणि यासाठी सेलिब्रेटींचाही यात महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे सोशल मिडियावर पोस्ट टाकण्यासाठी सेलिब्रेटींना मोठी रक्कमही दिली जाते.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीही भारताबरोबरच बाहेरही मोठा सेलिब्रेटी आहे. त्यामुळे त्याला सोशल मिडियावरही लाखो चहाते आहेत.
2008 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या कोहलीने क्रिकेटप्रमाणे सोशलमिडियामध्येही चांगली प्रगती केली आहे.
नुकतेच इंस्टाग्राम शेड्युलर हॉपरएचक्यूने एका इंस्टाग्राम पोस्टवर सर्वाधिक रक्कम घेणाऱ्या सेलिब्रेटींची यादी जाहीर केली आहे.
यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली 17 व्या क्रमांकावर आहे. तो इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकण्यासाठी साधारण 120,000 यूएस डॉलर्स (जवळजवळ 80 लाख रुपये) घेतो.
विशेष म्हणजे त्याने या यादीत जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू फ्लोयड मेवेदरलाही मागे टाकले आहे. विराट या यादीत खेळाडूंमध्ये 9 व्या क्रमांकावर असून एकूण 17 व्या क्रमांकावर आहे. तसेच यात तो एकमेव भारतीय आहे.
या यादीत अव्वल क्रमांकावर मॉडेल आणि उद्योजक काइली जेनर आहे. ती एका इंस्टाग्राम पोस्टसाठी 1 मिलियन यूएस डॉलर्स इतकी रक्कम घेते.
त्याचबरोबर खेळाडूंच्या यादीत फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो अव्वल स्थानी आहे. तो एका पोस्टसाठी 750,000 (अंदाजे ६ कोटी ) यूएस डॉलर्स ही रक्कम घेतो. तसेच त्याच्या पाठोपाठ अनुक्रमे नेमार, लियोनेल मेस्सी, डेव्हिड बॅकहेम आणि गॅरेथ बॅल हे पहिल्या पाचमध्ये आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–निराश मनोज तिवारीने निवड समितीला धरले धारेवर, ट्विटरवरुन जोरदार टीका करत केले ट्रोल
–भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया अ संघ जाहिर, वरीष्ठ संघातील महत्त्वाच्या खेळाडूंना संधी
–माजी कर्णधार सौरव गांगुलीची आर अश्विनसाठी बॅटिंग