भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या साखरपुड्या नंतर अवघ्या ५ महिन्यांत वडील बनल्याच्या बातमीनंतर चाहत्यांकडून भारतीय कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्याकडूनही अशी बातमी येण्याची सतत प्रतीक्षा करत आहेत.
मात्र याबाबत विरुष्काकडून अद्याप कोणतेही संकेत देण्यात आलेले नाहीत. सोशल मीडियावर विराट(Virat Kohli) आणि अनुष्का(Anushka Sharma) यांचा एक फोटो गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. ज्यामुळे विराट कोहलीच्या घरी छोटा पाहुणा येणार आहे की नाही. याबद्दल चाहत्यांना संभ्रमित केले आहे.
https://twitter.com/Kolly_fan/status/1274699356705349634
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोत विराट आपली पत्नी अनुष्का सोबत बेबी बंप वाला पोज देत असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत हा फोटो खरा आहे की एडिट करून व्हायरल होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत होता.
फोटोच्या सत्यतेची पडताळणी केल्यावर हे समोर आले आहे की हा फोटो पूर्णपणे एडिट केलेला आहे. ज्यामध्ये वरुन विराट आणि अनुष्का यांचे चेहरे लावले गेले आहेत. वास्तविक हा फोटो बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख(Ritesh Deshmukh) आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसूझा(Genelia D Souza) यांचा आहे. ज्यांनी २०१६ मध्ये आपल्या मुलाच्या जन्मापूर्वी फोटोशूट दरम्यान क्लिक केला होता.
https://www.instagram.com/p/BGFFn84B2b2/
महत्त्वाचे म्हणजे विराट आणि अनुष्का ११ डिसेंबर २०१७ रोजी विवाह बंधनात अडकले होते. जेव्हा फिल्मफेअर दरम्यान मुलाच्या योजनेसंदर्भात अनुष्काची मुलाखत घेण्यात आली होती. तेव्हा ती म्हणाली की आता ही बातमी तिला त्रास देत नाही. कारण जेव्हा तुम्ही लग्न कराल तेव्हा लोक विचारनारच की ती गर्भवती आहे का?
पुढे ती म्हणाली होती की लग्नानंतर गरोदरपणाबद्दल विचारले जाते आणि जेव्हा एखाद्याला डेटिंग करत असता तेव्हा लग्नाबद्दल विचारलं जातं. जर एखाद्या अभिनेत्रीने ट्रेंडनुसार मोठ्या आकाराचे कपडे घातले तर लोक म्हणतात की ती गर्भवती आहे.
प्रेग्नन्सीच्या अफवांबद्दल अनुष्काचं म्हणणं आहे. याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही आणि अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केले पाहिजे.
ट्रेंडिंग घडामोडी –
सचिन, द्रविड, गांगुली नाही तर हरभजन म्हणतो हा आहे भारताचा सर्वात मोठा मॅचविनर खेळाडू
या क्रिकेटपटूच्या वडिलांनी नैराश्यात येऊन केली होती आत्महत्या
इंग्लंडच्या दिग्गज कर्णधाराने रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी दिला ‘हा’ गुरुमंत्र