भारतात सध्या कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेने कहर केला आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढतच असून मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. याचा आरोग्य व्यवस्थेवर ताण पडला असून सुविधा अपुऱ्या पडत असल्याने अनेकांना मदतीची गरज भासते आहे.
भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा याच मदतकार्यात आपल्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकतेच त्यांनी एका लहानग्याला केलेल्या मदतीमुळे चर्चेत आले आहेत. या मदती बद्दल त्यांचे कौतुक देखील होत आहे.
अयांशला केली मदत
भारतात कोरोना विषाणूचा फटका बसलेल्या लोकांना मदत करण्यासाठी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी एक फंड रेझिंग कॅम्पेन सुरू केले होते. ‘केट्टो’ या नावाने हे कॅम्पेन सुरू झाले होते. यात लोकांच्या मदतीतून ७ दिवसात ७ कोटी रुपये जमा करण्याचे अभियान राबवण्यात आले होते. जे यशस्वी ठरले होते. हे पैसे एसीटी ग्रांट्स या संस्थेला दिल्या गेले, ज्यातून ऑक्सिजन आणि आरोग्याशी निगडित इतर सुविधा उपलब्ध केल्या गेल्या.
आता हे वृत्त समोर येते आहे की विराट आणि अनुष्काने अभियानातून जे पैसे उभे केले, त्यातून एका लहान मुलाचा जीव वाचवण्यात आला आहे. अयांश असे या मुलाचे नाव असून त्याला एसएमए (स्पायनल मस्क्युलर एट्रोफी) नावाचा दुर्मिळ आजार आहे. या आजारावरील उपचारासाठी विराट आणि अनुष्काच्या मदतीने १६ कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला. ज्यामुळे अयांशवर उपचार करणे शक्य झाले. आणि आता तो या आजारातून बरा देखील झाला आहे.
या कृतीमुळे पुन्हा एकदा विरुष्काच्या जोडीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. सोशल मिडीयावर अनेकांनी सामाजिक जाणीव दाखवत मदत केल्याबद्दल विराट कोहली अनुष्का शर्मा यांचे कौतुक केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटचा नवा लूक व्हायरल; चाहते म्हणतात, हा तर मनी हाईस्टमधील प्रोफेसरचा देसी व्हर्जन
काय सांगता! ३९ वर्षीय आईने १२ वर्षीय मुलासोबत रचला विक्रम, केली शतकी भागीदारी
टेस्ट चॅम्पियनशीप फायनल: पुजारा की टेलर कोण आहे सरस? पाहा ‘ही’ आकडेवारी