---Advertisement---

VIDEO। मुंबईच्या रस्त्यावर ‘विरुष्काची’ स्कूटर राईड! फॅन्स पासून वाचण्यासाठी वापरली खास आयडिया

On: शनिवार, ऑगस्ट 20, 2022 7:39 PM
Anushka-Sharma-Virat-Kohli-Bike-Ride
---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सोमवारी (२२ ऑगस्ट) आशिया चषकासाठी रवाना होणार आहे. तो टीम इंडियासोबत झिम्बाब्वेला गेला नाहीये. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर कोहलीने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान त्याने लंडन आणि पॅरिसमध्ये सुट्टी घालवली. कोहली सध्या कुटुंबासह मुंबईत आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो स्कूटर चालवताना दिसत आहे.

कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत स्कूटरवर मुंबईत फिरताना दिसला. चाहत्यांना टाळण्यासाठी दोघांनी काळ्या चष्मासह हेल्मेट घातले होते. असे असूनही, चाहत्यांनी त्याला ओळखले. त्यानंतर विराटचे फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल झाले. फोटो पाहून असे दिसते की कोहली आणि अनुष्का शूटसाठी स्कूटरवर गेले होते.

https://www.instagram.com/reel/ChezQzZK_cg/?utm_source=ig_web_copy_link

यापूर्वी अनुष्काने कोहलीसोबतचे फोटो शेअर केले होते. या फोटोत अनुष्का आणि विराट मस्तीच्या मूडमध्ये दिसत होते. यामध्ये दोघांच्याही जॅकेट आणि टी-शर्ट या दोन्हींचा रंग सारखाच आहे. कोहली आणि अनुष्काने रॉकस्टार्ससारखी पोज दिली. हा फोटो शेअर करताना अनुष्काने कोहलीला ‘क्यूट बॉय’ म्हटले आहे. तिने लिहिले, “मला नेहमीच एका गोंडस व्यक्तीसोबत बँड सुरू करायचा होता.”

https://www.instagram.com/p/Cg1JEDzMsAr/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, दोघेही नुकतेच विमानतळावर देखील दिसले होते. त्यानंतर विराटने फोटो काढणाऱ्यांना मुलगी वामिकापासून दूर राहण्यास सांगितले होते. आपल्या मुलीचा फोटो कोणी काढावा असे त्याला वाटत नाही.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

जसप्रीत बुमराह आणि शाहीन आफ्रिदी आशिया चषकातून बाहेर! फलंदाजांना मिळणार मोकळे रान

दु:खद बातमी। गोलंदाजाचा घातक बॉल छातीत लागल्याने फलंदाजाने गमावले प्राण

Breaking! भारताविरुद्धच्या बहुप्रतिक्षित सामन्यापूर्वी पाकिस्तानला झटका, स्टार गोलंदाज एशिया कपमधून बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---