---Advertisement---

गंभीर-विराटवर मॅच रेफ्रींनी उगारला कडक कारवाईचा बडगा! नवीनला ठोठावला मोठा दंड

---Advertisement---

आयपीएल 2023चा 43 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने जिंकला. लखनऊ सुपरजायंट्सला त्यांच्या घरच्या मैदानावर 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जोरदार बाचाबाची झाली. आरसीबीचा कर्णधार विराट कोहली, लखनऊचा युवा वेगवान गोलंदाज नवीन उल हक व लखनऊ चा मेंटर गौतम गंभीर हे या वादाच्या केंद्रस्थानी होते. त्या वादनंतर मॅच रेफ्रींनी त्यांच्यावर कारवाई केली आहे.

https://twitter.com/IconicKohIi/status/1653104521453920259?t=UWiJBpzFU-153z4c356vSQ&s=19

 

लखनऊ येथील इकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीने छोट्या धावसंख्येचा बचाव करत शानदार विजय मिळवला. मात्र सामन्या दरम्यान विराट कोहली व नवीन उल हक यांच्या दरम्यान बाचाबाची झाली होती. सामना संपल्यानंतर हात मिळवणे करताना देखील या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर लखनऊचा मेंटर गौतम गंभीर याने देखील या वादात उडी घेत विराटला काही शाब्दिक वार केले. हे प्रकरण चिघळल्याने दोन्ही खेळाडू एकमेकांच्या अंगावर गेले. अनेकांनी यावर तिखट प्रतिक्रिया देत हे व्यावसायिक खेळाडूंना शोभणारे वर्तन नसल्याचे म्हटले.

झालेल्या संपूर्ण प्रकरणाबाबत मॅच रेफ्री यांनी सर्व खेळाडूंना बोलावून प्रकरणाविषयी जाणून घेतले. त्यानंतर विराट कोहली व गौतम गंभीर यांना मॅच फीसच्या शंभर टक्के तसेच नवीन उल हकला मॅच फीसच्या 50% कपात करण्यात आली.

या वादाची सुरुवात यापूर्वी झालेल्या पहिल्या सामन्यातून झाली होती. लखनऊने आरसीबीला त्यांच्या घरच्या मैदानावर अखेरच्य चेंडूवर पराभूत केलेले. त्यावेळी लखनऊचा आवेश खान व गौतम गंभीर यांनी केलेल्या आक्रमक सेलिब्रेशनमुळे आरसीबीचे खेळाडू दुखावले गेलेले.

(Virat Kohli And Gautam Gambhir Fined 100% Of Match Fees And Naveen Ul Haq 50% After Breaching IPL Code Of Conduct)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पराभवांनी हलले राजस्थान-सीएसकेचे सिंहासन! मुंबईची मुसंडी मारण्यास सुरुवात, अशी आहे गुणतालिका
डेव्हिड-पोलार्डची तुलना होऊ लागल्यावर कॅप्टन रोहितचे मोठे वक्तव्य, म्हणाला “त्याच्याकडे क्षमता आहे. मात्र…”

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---