---Advertisement---

सामना संपल्यानंतर विराट आणि गंभीरमध्ये राडा! आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा भिडले दिग्गज

On: मंगळवार, मे 2, 2023 12:44 AM
Virat Kohli vs Gautam Gambhir
---Advertisement---

सोमवारी (1 मे) लखनऊच्या इकाना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्सला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात दोन्ही संघ धावा करण्यासाठी झगडताना दिसले. मात्र विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला. विराट कोहलीने लाईव्ह सामन्यात दिलेल्या एका रिएक्शननंतर सामना संपल्यानंतर गंभीर विराटवर संतापल्याचे पाहायला मिळाले.

आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामातील हा 43 वा सामना होता, ज्यामध्ये आरसीबीने लखनऊचा दारून पराभव केला. विराट कोहली (Virat Kohli) या सामन्यात 30 चेंडूत 31 धावा करू शकला. दुसरीकडे लखनऊचाही एकही फलंदाज 30 धावांचा टप्पा गाठू शकला नाही. विराटने लखनऊच्या डावात कृणाल पंड्या याचा झेल पकडल्यानंतर प्रेक्षकांकडे पाहून एक रिएक्शन दिली. यात विराट तोंडावर बोट ठेवणे योग्य नसल्याचे सांगत होता. तत्पूर्वी बेंगलोरमध्ये आरसीबीविरुद्ध शेवटच्या चेंडूवर विजय मिळवल्यानंतर गौतम गंभीर () याने प्रेक्षकांकडे पाहून तोंड बंध ठेण्याचा इशारा केला होता. विराटने या सामन्यात दिलेली रिएक्शन गंभीरसाठी थेट प्रत्युत्तर असल्याचे सोशल मीडियावर बोलले जात होतो.

https://twitter.com/deepika45638/status/1653101780987965443?s=20

https://twitter.com/premthoogudeepa/status/1653107443289964547?s=20

या चर्चा सुरू असतानाच सामना संपल्यानंतर अचानक विराट आणि गंभारी यांच्यात मैदानात वाद सुरू झाला. सामना संपल्यानंतर कायल मेअर्स आणि विराट यांच्यात चर्चा सुरू होती. तितक्यात गंभीर त्याठिकाणी येतो आणि मेअर्सला स्वतःसोबत घेऊन जातो. यावेळी विराट या गोष्टीकडे दुर्लक्ष करताना दिसला. पण पुढे संघातील इतर खेळाडूंसोबत हात मिळवताना विराट आणि नवीन उल हक यांच्यात शाब्दिक वाद झाला. हा वाद पाहताच गंभीर देखील तत्काळ विराटवर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पुढे विराट गंभीशी चर्चा करताना दिसला आणि उपस्थित खेळाडू आणि पंचांनी दोघांना शांत केले. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

https://twitter.com/IconicKohIi/status/1653104521453920259?s=20

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1653101110436196352?s=20

https://twitter.com/premthoogudeepa/status/1653107443289964547?s=20

उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 126 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊने 19.5 षटकात 108 धावा केल्या आणि सर्व विकेट्स गमावल्या. दरम्यान, ही पहिली वेळ नाहीये, जेव्हा विराट आणि गंभारमध्ये अशा प्रकारे लाईव्ह सामन्यात वाद झाला आहे. यापूर्वी आयपीएल 2013 मध्येही विराट आणि गंभीर एकमेकांशी भिडले होतेय. यावेळी विराट आरसीबीचे, तर गंभीर केकेआरचे नेतृत्व करत होता. (Virat Kohli and Gautam Gambhir got involved in a verbal fight after RCB won against LSG.)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लखनऊमध्ये जाऊन आरसीबीने पाडला सुपरजायंट्सचा कंडका! 127 धावांचा बचाव करत विराटसेना ‘विनिंग ट्रॅकवर’
गंभीरच्या खुन्नसला विराटचे प्रेमाने उत्तर! एकाच कृतीने जिंकले लखनऊच्या चाहत्यांचे मन, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---