टी20 विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. भारतीय संघाने पर्थ येथे पोहोचताच दुसऱ्या दिवशीच सराव सत्र आयोजित केले. भारतीय संघ 10 आणि 13 ऑक्टोबर रोजी दोन सराव सामने खेळणार असून, त्यानंतर ते ब्रिस्बेनला रवाना होतील. ब्रिस्बेन येथे भारतीय संघ ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी आयोजित सराव सामने खेळणार आहे. 23 ऑक्टोबरला विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात मेलबर्नमध्ये भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. यामुळे खेळाडूंना ऑस्ट्रेलियन परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत होईल. तत्पूर्वी, भारताच्या या पहिल्या सराव सत्रात विराट कोहली व रोहित शर्मा घाम गाळताना दिसले.
शनिवारी (8 ऑक्टोबर) भारतीय संघ वाकामध्ये सराव सत्रासाठी पोहोचला. जिथे संघाच्या प्रमुख खेळाडूंनी सराव सत्रात भाग घेतला. भारतीय संघाच्या सराव सत्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विराट कोहली आणि केएल राहुल फलंदाजीचा सराव करताना दिसत आहेत. दोन्ही खेळाडू या व्हिडिओमध्ये चांगल्या लयीत खेळताना दिसत आहेत.
Long net session for Kohli and KL Rahul at the WACA this morning. #Cricket #kohli pic.twitter.com/QGAe98v5N6
— Gav Joshi (@Gampa_cricket) October 8, 2022
एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील 2007 मध्ये भारतीय संघाने पहिल्यांदा झालेला टी20 विश्वचषक आपल्याला होता. मात्र, तेव्हापासून आजवर पंधरा वर्षांनंतर ही भारतीय संघाला स्पर्धेचे विजेतेपद जिंकता आले नाही. 2014 विश्वचषकात भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेले. भारताने अखेरच्या वेळी 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपाने अखेरची आयसीसी स्पर्धा जिंकली होती. यानंतर भारताने अनेक स्पर्धांच्या अंतिम फेरीत धडक मारली, पण विजेतेपद मिळवता आले नाही.
विश्वचषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू: मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ज्याच्या जीवावर खेळणार होते तोच बाहेर! आयर्लंडच्या प्रमुख गोलंदाजाची वर्ल्डकपमधून एक्झिट
चेंडू 110 मीटर गेला, तरीही टिम डेविडचे नाही भरले मन; म्हणाला, ‘पुढच्या वेळी…’