सध्या भारत आणि बांगलादेश या संघात पहिला कसोटी सामना चट्टोग्राम येथे खेळवला जातोय. सामन्याच्या चौथ्या दिवशी बांगलादेशने दुसऱ्या डावात फलंदाजी करत 6 गडी गमावत 271 धावा केल्या. अशातच मैदानावर अशी घटना घडली ज्यामुळे प्रत्येक भारतीय खेळाडू आणि भारतीय चाहते नाराज झाले. बांगलादेशची फलंदाजी सुरु असताना पंचाच्या एका निर्णयावर भारताच्या खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आणि रागात चेंडूला लाथ मारली.
65व्या षटकात कुलदीप यादव (Kuldeep Yadav) गोलंदाजीसाठी आला, त्यावेळी बांगलादेशचा लिटन दास (Litton Das) फलंदाजी करत होता. कुलदीपने त्याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि पायचितची अपील पंचांकडे केली. मात्र पंचांनी त्याला नाबाद घोषीत केले. त्यानंतर भारताने रिव्हियू घेतला आणि रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते की चेंडू थेट यष्टींवर जाऊन लागणार होता. मात्र, इम्पॅक्ट अंपायर्स कॉल असल्याने त्यांनी आधी दिलेला निर्णय अंतिम मानन्यात आला. तिसऱ्या पंचांचा निर्णय आल्यावर विराट कोहली आणि कुलदीप यादव मैदानावरील पंचांच्या निर्णयाशी खुष नव्हतेे आणि नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होती. पंचांचा निर्णय आल्यावर कुलदीपने चेंडू जमिनीवर आदळला आणि चेंडूला लाथ मारताना दिसला. तसेच कोहली पंचांशी चर्चा करताना दिसला. भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड देखील पंचांच्या या निर्णयाशी असहमत दिसले. मात्र लिटनला या गोष्टीचा फायदा घेता आला नाही आणि आपल्या धावसंख्येत केवळ 5 धावा जोडत तंबूत परतला.
बांगलादेशच्या दुसऱ्या डावात झाकीर हसन (Zakir Hasan) याने आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकवले. मात्र, नंतर भारतीय फिरकीपटूंनी संघाचे पुनरागमन करण्यात चांगली मदत केली. त्यांच्या धमाकेदार प्रदर्शनामुळे भारतीय संघ पहिला कसोटी सामना जिंकण्याच्या जवळ पोहोचला. भारतीय संघाला चौथ्या दिवशी विकेट मिळवण्यासाठी मेहनत करावी लागली. बांगलादेशचा पहिला गडी 124च्या धावसंख्येवर बाद झाला, तर दुसरा गडी 131 धावांवर बाद झाला. नंतर ठराविक अंतराने गडी बाद झाले आणि चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशची धावसंख्या 6 बाद 272 अशी होती. या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी बांगलादेश संघाला विजयासाठी 241 धावांची गरज आहेे तर भारताला विजयासाठी 4 विकेट्सची गरज आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिचा घोषची झुंजार खेळी भारताला विजय मिळवून देण्यात अपयशी, ऑस्ट्रेलियाने टी20 मालिका घातली खिशात
केरळवासियांच्या प्रेमामुळे नेमारही भावून, आभार मानण्यासाठी केली खास पोस्ट