भारतीय संघाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) सध्या बांगलादेशविरूद्ध कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहेत. तत्पूर्वी अलीकडेच रोहित आणि विराट आगामी होणाऱ्या आयपीएल 2025 मध्ये खेळणार का? अशा काही चर्चा होऊ लागल्या आहेत, कारण या दोन्ही दिग्गजांनी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या बातमीद्वारे आपण हे दोन दिग्गज आयपीएल खेळणार की नाही? हे जाणून घेऊया.
खरे तर, रोहित आणि विराट आयपीएल खेळणार नसल्याची ही केवळ अफवा आहे, जी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर होऊ लागली. भारताने 2024चा टी20 विश्वचषक जिंकला, त्यानंतर विराट आणि रोहितने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यांनी टी20 क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटला अलविदा केला आहे.
विराट आणि रोहित आयपीएल 2025 मध्ये नक्कीच खेळणार आहेत. पण आगामी आयपीएल हंगामापूर्वी मेगा लिलाव होणार आहे. मात्र, मेगा लिलावापूर्वी ते कोणत्या संघासाठी खेळताना दिसणार हे स्पष्टपणे सांगता येणार नाही. कोहली पुन्हा एकदा आरसीबीकडून खेळताना दिसू शकतो, परंतु रोहितबद्दल अशी अटकळ बांधली जात आहे की, तो लवकरच मुंबई इंडियन्स (Mumbai Indian’s) सोडू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट कोहलीनं घेतली बांगलादेशची मजा! मैदानावरील नागिन डान्सचा व्हिडिओ व्हायरल
कसोटीमध्ये रिषभ पंत यशस्वी का? सामन्यानंतर स्वत:च केला मोठा खुलासा
टीम इंडियाला मिळाले पुजारा-रहाणेचे उत्तराधिकारी! ही जय-वीरूची नवी जोडी करणार कसोटीत धमाल