आयपीएल 2023 च्या 9व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमने सामने होते. होम ग्राउंड ईडन गार्डनवर झालेल्या या सामन्यात केकेआरने 81 धावा राखून मोठा विजय मिळवला. केकेआरचा मालक शाहरुख खान स्वतः स्टेडियममध्ये उपस्थित राहून सामन्याचा आनंद घेताना दिसला. विजयानंतर शाहरुखने विरोधी संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याची गळाभेड घेतली आणि दोघांनी सोबत डान्स देखील केला.
आपला संग कोलकाता नाईट रायडर्स जिंकल्यानंतर शाहरुख खान (Shahrukh Khan) खूपच आनंदी होता. त्याने सामना संपल्यानंतर स्टॅन्समधून मैदानात येण्याचा निर्णय घेतला. मैदानात आल्यानंतर शाहरुख उपस्थित चाहत्यांना अभिवादन करत होता. सामना सुरू असताना देखील शाहरुखवर नजर ठेवणाऱ्या चाहत्यांची संख्या मैदानात मोठ्या प्रमाणात होती. अशात किंग खान मैदानात उतरल्यानंतर चाहत्यांकडूनही त्याला मोठ्या प्रमाणात दाद दिली गेली. मैदानात शाहरुखने विराट कोहली (Virat Kohli) याची भेट घेतली. यावेळी विराट आणि शाहरुखमध्ये गळाभेट झाली. सोबत शाहरुखचा नवीन चित्रपट पठाण याचे टायटल ट्रॅक ‘झुमे जो पठाण’ गाण्यावर दोघांनी डान्स देखील केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.
#ViratKohli #KKRvsRCB #KKRvRCB
Shahrukh Khan meets Virat Kohli.Two of the best from India! and both of them shaking legs for jhoome jho pathaan https://t.co/PJncZL9tUK
— 👌⭐ 👑 (@superking1816) April 6, 2023
https://twitter.com/PanavSrivastava/status/1644034964131024896?s=20
दरम्यान, शाहरुखव्यतिरिक्त या सामन्यात केकेआरच्या खेळाडूंची देखील चांगलीच चर्चा झाली. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला शार्दुल ठाकुर (Shardul Thakur) केकेआरसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. शार्दुलने अवघ्या 29 चेंडूत 68 धावांची खेळी केली. त्याआधी सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज याने 44 चेंडूत 57 धावांची खेळी केली. तर मध्यक्रमात रिंकू सिंग याने 33 चेंडूत महत्वाच्या 46 धावा केल्या. या तिघांच्या ताबडतोड खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजीला आलेला केकेआर संघ 20 षटकांमध्ये 7 बाद 204 धावांपर्यंत पोहोचू शकला. प्रत्युत्तरात आरसीबी संघ मात्र 17.4 षटकांमध्ये 123 धावा करून सर्वबाद झाला. सलामीवीर फाफ डू प्लेसिसने आरसीबीसाठी सर्वाधिक 23 धावा केल्या. केकेआरच्या वरुण चक्रवर्ती याने 4, तर सुयश शर्मा याने 3 विकेट्स घेतल्या. या दोघा फिरकी गोलंदाजांच्या जोरावर केकेआरला हा मोठा विजय मिळवता आला. (Virat Kohli and Shah Rukh Khan dance)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विजयानंतर KKRची गरुडझेप! पॉइंट्स टेबलमध्ये RCBला जबर धक्का, तिसऱ्या स्थानावरून थेट ‘या’ स्थानी घसरण
आयपीएल सुरू असताना वाढल्या पृथ्वी शॉच्या अडचणी! सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सरने केले आरोप