श्रीलंकेविरुद्ध आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने जबरदस्त सुरुवात केली. मोहम्मद सिराज याने आपल्या स्पेलमधील दुसऱ्याच षटकात श्रीलंकेच्या एक-दोन नाही तर तब्बल चार विकेट्स घेतल्या. भारतासाठी सिराजचे हे प्रदर्शन अतिशय महत्वाचे आठरले. पण तरीही विराट कोहली आणि शुबमन गिल सिराजवर हसताना दिसले.
भारताने आशिया चषक 2023च्या अंतिम सामन्यात नाणेफेक गमावली. नाणेफेक जिंकणाऱ्या श्रीलंकन संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण कर्णधार दासून शनाका () याचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. कारण संघाची धावसंख्या 12 असताना श्रीलंकेच्या पहिल्या 6 विकेट्स गेल्या होत्या. यातील पाच विकेट्स एकट्या मोहम्मद सिराज () याने घेतली. श्रीलंकेच्या डावातील चौथे षटका निर्णायक ठरले. या षटकात मोहम्मद सिराज गोलंदाजीला आला होता आणि चार विकेट्स घेतल्या.
हे षटक श्रीलंकेसाठी महागात पडले. पण षटकातील पाचव्या चेंडूवर धनंजया डी सिल्वा () याने चौकार मारला. डी सिल्वाने मैदानात गॅप पाहून हा शॉट खेळल्यामुळे चेंडू अडवण्यासाठी एकही खेळाडू उपस्थित नव्हता. अशात सिराजने स्वतः हाचेंडू अडवण्यासाठी प्रयत्न केला, पण चौकार गेलाय. चेंडू अडवण्यासाठी सिराज चक्क सीमारेषेपर्यंत धावला. गोलंदाज स्वतः चेंडू अडवण्यासाठी सीमारेषेपर्यंत धावण्याची ही बहुदा पहिली वेळ असू शकते. मैदानातील हे चित्र पाहून अनेकांना हसू आले. मैदानात उपस्थित विराट कोहली आणि शुमबन गिल यांनाही हसू रोखता आले नाही. विराट आणि गिल हसतानाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Virat Kohli and Shubman Gill couldn’t control their laughter seeing Mohammad Siraj run to the boundary to stop the 4. Miya Bhai #siraj #INDvsSL #INDvSL#AsiaCupFinalspic.twitter.com/o1yDdYbeqN
— Introvert Boy (@_introvertboy__) September 17, 2023
Virat Kohli and Shubman Gill couldn’t control their laughter seeing Mohammad Siraj run to the boundary to stop the 4. pic.twitter.com/rxN2Wa4rM3
— Aadarsh (@AadarshParab) September 17, 2023
(Virat Kohli and Shubman Gill couldn’t control their laughter seeing Mohammad Siraj)
आशिया चषक 2023च्या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
श्रीलंका – पथुम निसांका, कुशल परेरा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दसून शनाका (कर्णधार), दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथीशा पथिराना.
महत्वाच्या बातम्या –
मोहम्मद सिराजने केला कहर! एकाच ओव्हरमध्ये घेतल्या श्रीलंकेच्या 4 विकेट्स, जगात होतंय कौतुक
विक्रमवीर हिटमॅन! आशिया कप फायनलमध्ये पाऊल ठेवताच रोहितने बनवले दोन मोठे रेकॉर्ड