नुकताच भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघावर ८ गडी राखून विजय मिळवला. या मोठ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला सराव सामने खेळण्याची संधी मिळाली नव्हती, ज्याचा परिणाम या मोठ्या सामन्यात दिसून आला होता. यानंतर इंग्लंडविरुद्धच्या आगामी ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेपपुर्वीही असेच काहीसे चित्र पाहायला मिळू शकते.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात येत्या ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाला सराव सामने खेळायला मिळणार नाहीत. भारतीय कर्णधार विराट कोहलीने याबाबत निराशा व्यक्त केली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, “कोविड-१९ च्या नियमांनुसार ऑगस्ट महिन्यात पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी ते( भारतीय संघ) आपल्या खेळाडूंचे दोन संघ तयार करून चार दिवसांचा सराव सामना खेळतील.” (Virat Kohli and team to play intra squad games in Durham before test series against England)
बीसीसीआय सराव सामने खेळवण्यास पुन्हा एकदा ठरले अपयशी
बीसीसीआयने ईसीबीकडे सराव सामने खेळू देण्याची मागणी केली होती. परंतु कोविड १९ च्या नियमांनुसार याप्रकारची योजना पूर्ण करणे कठीण दिसून येत आहे. भारतीय संघाला काउंटी संघासोबत सराव सामने खेळायचे होते. परंतु ईसीबीच्या प्रवक्त्याने यासाठी स्पष्ट नकार दिला आहे. कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यानंतर भारतीय २० दिवसांच्या सुट्टीवर जाणार आहे. त्यानंतर भारतीय संघाला १४ जुलै रोजी लंडनमध्ये एकत्र यावे लागणार आहे. त्यानंतर ते डरहमला रवाना होणार आहेत.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, “इंग्लंडमध्ये देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा खेळणारे क्रिकेटपटू बायो बबलमध्ये नसणार आहेत. त्यामुळे भारतीय संघाला इंट्रास्क्वाड सराव सामने खेळावे लागणार आहेत. भारतीय संघ यावेळी २४ खेळाडूंसह (२० मुख्य आणि ४ राखीव खेळाडू) इंग्लंडला रवाना झाला आहे. ज्यामुळे त्यांना इंट्रास्क्वाड सामना खेळता येईल.”
महत्वाच्या बातम्या-
‘टीम धवन’सोबत २ निवडकर्तेही जाणार श्रीलंकेला, पाहा १८ सदस्यीय सपोर्ट स्टाफची संपूर्ण यादी
कसोटी पदार्पणात शतक ठोकल्यानंतर गांगुली झाला होता नर्वस, सचिनने ‘अशी’ केली होती मदत
दक्षिण आफ्रिकेच्या अव्वल गोलंदाजाने शोधली पुजाराच्या फलंदाजीतील चूक, वाचा काय म्हणाला