---Advertisement---

उपकर्णधार अजिंक्य रहाणेला अशा दिल्या कर्णधार विराट कोहलीने शुभेच्छा

On: रविवार, जून 7, 2020 11:51 AM
---Advertisement---

मुंबई । भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने अनेक सामन्यात एक हाती किल्ला लढवत अफलातून खेळी केली आहे. बर्फासारखा शांत स्वभावाचा, अफलातून क्षेत्ररक्षक आणि मध्य क्रमात फलंदाजी करणार्‍या अजिंक्यने गुरुवारी आपला वाढदिवस साजरा केला.

32 वर्षाचा झालेला अजिंक्यवर वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छांचा वर्षाव झाला. कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, रविचंद्रन, अश्विन, चेतेश्वर पुजारा, प्रशिक्षक रवी शास्त्री यासह बीसीआयने ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

कोहलीने ट्विटमध्ये लिहिले की, ” तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. येणारे वर्ष तुझ्यासाठी खूप चांगले जावो जिंक्स.” रहाणेला संघातील खेळाडू जीन्स या टोपणनावाने बोलवतात.

एकदिवसीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याने लिहिले की, वाढदिवसाच्या शुभेच्छा! आपल्या परिवारासोबत एक चांगला दिवस. शुभेच्छा!

 

भारताचा फिरकीपटू आर. अश्विन ट्विट केले की, ” पुन्हा एकदा स्लीपमध्ये उभे राहून कॅच पकडताना पाहायचा आहे.  जास्त वाट पाहू शकत नाही. तुला चांगला दिवस जाऊ मित्रा.”

हॅप्पी बर्थडे अजिंक्य रहाणे भाऊ हे वर्ष तुला सुखाचे यशाचे जावो, अशा शुभेच्छा भारताचा कसोटी संघातील नियमित सदस्य चेतेश्वर पुजारा यांनी दिले.

भारताचा कसोटी संघातील यष्टीरक्षक वृद्धिमान साहा यांने देखील रहाणेचे कौतुक केले आहे. ट्विटमध्ये लिहिले की, “तुला येणारे वर्ष खुशालीत जावो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”

https://twitter.com/imkuldeep18/status/1269191545997197313

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---