---Advertisement---

सराव सामन्यातही वाद, पंचांनी चुकीच्या पद्धतीने आऊट दिल्यानंतर संतापला विराट; मैदानातच विचारला जाब

On: शुक्रवार, जून 24, 2022 12:58 PM
Virat-Angry-On-Umpire
---Advertisement---

इंग्लंडविरुद्धच्या पुनर्निधारित पाचव्या व अखेरच्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघ लिसेस्टरशायर संघाविरुद्ध लिसेस्टर येथे ४ दिवसीय सराव सामना खेळत आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर भारतीय संघ ६०.२ षटकात ८ बाद २४६ धावा अशा स्थितीत आहे. या दिवशी भारताकडून श्रीकर भरत याने चिवट झुंज दिली. त्याच्याबरोबर विराट कोहली याने संथ आणि छोटेखानी खेळी करत धावफलक हालता ठेवला. मात्र पंचांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे त्याला आपली विकेट गमवावी लागली, ज्यानंतर विराट पंचांवर संतापल्याचे दिसून आले. 

त्याचे झाले असे की, प्रथम फलंदाजी करताना भारताची वरची फळी अपयशी ठरली. रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही सलामी जोडी संघाच्या अवघ्या ५० धावांवर पव्हेलियनला परतली. मात्र त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत विराट कोहलीने (Virat Kohli) मोर्चा सांभाळला. एका बाजूने विकेट्स जात असताना तो बचावात्मक खेळी करत होता.

यादरम्यान ३३ धावांवर खेळत असताना पंचांनी त्याला चुकीच्या पद्धतीने बाद दिले. लिसेस्टरशायरचा युवा गोलंदाज रोमन वॉकरचा एक चेंडू विराटच्या पॅडला जाऊन लागला. त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंनी पंचांकडे जोरदार अपील केली. परंतु पंचांनी काही सेकंदांचा वेळ घेतला आणि त्यानंतर विराट बाद असल्याचा निर्णय दिला. हे पाहून विराट नाराज झाला. तो खेळपट्टीवरच थांबून इशाऱ्यात पंचांशी त्यांच्या निर्णयाबद्दल विचारपूस करू लागला. यादरम्यान त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसत होती. पुढे पंचांनीही विराटला आपल्या निर्णयामागचे कारण सांगितल्यानंतर तो मान खाली घालून पव्हेलियनला परतला.

असा राहिला पहिला दिवस
दरम्यान सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांना विशेष खेळ दाखवता आला नाही. भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज श्रीकर भरत याने एकट्याने खिंड लढवली. ११ चेंडू खेळताना १ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ७० धावा करत भरत मैदानावर टिकून आहे. त्याच्याव्यतिरिक्त भारताकडून एकाही फलंदाजाला साधे अर्धशतकही करता आलेले नाही. विराटच्या ३३ धावांव्यतिरिक्त रोहित शर्मा (२५ धावा) आणि उमेश यादव (२३ धावा) यांनी थोडेफार योगदान दिले आहे.

लिसेस्टरशायर संघाकडून रोमन वॉकरने ५ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच विल डेविस आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी २ आणि १ विकेट घेतली आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

विराट कोहलीने जो रूटच्या ‘मॅजिक ट्रिक’ची नक्कल करण्याचा केला प्रयत्न, पण शेवटी झालं हसू

पांड्याची सेना आयर्लंडमध्ये दाखल, इथेही फडकावणार विजयी पताका?

ENGvsIND: टीम इंडियासाठी गुड न्यूज, फलंदाजांना चारी मुंड्या चीत करणारा पठ्ठ्या मोठ्या संकटातून मुक्त

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---