---Advertisement---

बाप होणार विराट कोहली, पण ट्रोल होतोय सैफ अलीचा मुलगा तैमूर

---Advertisement---

नवी दिल्ली। भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली लवकरच वडील होणार आहे. त्याने अनुष्का शर्माच्या बेबी बंपचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर करुन ही माहिती दिली आहे. पुढच्या वर्षी जानेवारीत एक नवीन पाहुणा त्याच्या घरी येणार असल्याचेही त्याने सांगितले आहे.

तैमूरला केले ट्रोल

विराटच्या वडील होण्याची बातमी समजताच जगभरातून त्यांचे अभिनंदन होऊ लागले. त्याचवेळी चाहत्यांच्या गंमतीशीर प्रतिक्रिया सोशल मीडियावरही पाहायला मिळाल्या. ज्या खूप व्हायरल होत आहेत. अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी करिना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूरला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ज्यांची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.

https://twitter.com/being__paranoid/status/1298878979869310977

https://twitter.com/Sarco69/status/1298878510929330177

बीसीसीआयने केले अभिनंदन

विराट आणि अनुष्काच्या या घोषणेसह त्यांचे जवळचे मित्र आणि चाहते यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि या जोडप्याला नवीन कुटुंबातील सदस्यासाठी शुभेच्छा दिल्या. अनुष्काच्या या पोस्टचे स्वागत भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि आलिया भट्ट यांनी केले, तर दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसीसनेही विराटच्या पोस्टवर शुभेच्छा दिली. त्याचबरोबर बीसीसीआयनेही विराटचे अभिनंदन केले आहे.

https://twitter.com/BCCI/status/1298865458699878400

२०१७ मध्ये केले होते लग्न

दीर्घ संबंधानंतर १० डिसेंबर २०१७ मध्ये विराट आणि अनुष्काने लग्न केले होते. दोघांची २०१३ मध्ये शैम्पूच्या जाहिराती दरम्यान भेट झाली होती. जाहिरातीच्या शूटनंतर दोघांना बर्‍याचदा एकत्र पाहिले होते, दोघेही कठीण काळात नेहमी एकमेकांच्या सोबत असतात. विराटने स्वत: अनेकवेळा असे म्हटले आहे की, अनुष्काने त्याला एक चांगला व्यक्ती बनवला आहे आणि अनुष्कालाही तो आपल्या यशाचे श्रेय देतो.

महत्त्वाच्या बातम्या-

-पाणीपुरी विकून जीवन जगणाऱ्या पठ्ठ्याचे आता बदलणार आयुष्य; गुरुमंत्र घेऊन ठेवतोय आयपीएलमध्ये पाऊल

-विराट कोहली बाप होणार असल्याची बातमी कळताच क्रिकेट ऑस्ट्रेलियाची उडाली झोप

-नवरा क्रिकेटच्या मैदानात तर बायको तमिळ चित्रपट सृष्टीत करतेय धमाका

ट्रेंडिंग लेख-

-‘या’ २ अष्टपैलू क्रिकेटर्ससाठी आयपीएल ठरणार लकी; भविष्यात मिळणार भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी?

-वाढदिवस विशेष: धारदार यॉर्करने भल्याभल्यांची भंबेरी उडवणारा लसिथ मलिंगा

-विराट यंदा सनराइजर्स हैद्रबादकडून शानदार कामगिरी करण्यास सज्ज; तर ‘या’ ४ खेळाडूंवरही असेल सर्वांचे लक्ष

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---