टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा सध्या लंडनमध्ये आहेत. दरम्यान, कोहली आणि अनुष्का लंडनला शिफ्ट झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र, यावर दोघांकडूनही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. आता कोहली आणि अनुष्काचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात दावा केला जात आहे की, हे दोघे लंडनमधील एका कीर्तन सोहळ्यात सहभागी झाले होते.
When everyone is busy in ambani wedding ,my idolo visit ISKCON Temple in London with his wife . pic.twitter.com/1AAr4ZxeuY
— Mahiya18 (@18Mahiya) July 8, 2024
वास्तविक, कोहली आणि अनुष्काचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ जुना आहे. कोहली आणि अनुष्का कीर्तनासाठी इस्कॉन मंदिरात पोहोचले, या घटनेला बराच काळ लोटला आहे. टीम इंडियानं टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर विराट कोहली संघासह दिल्लीत आला. तेथे संपूर्ण संघानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर मुंबईत विजय परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. हे सर्व आटोपल्यानंतर कोहली लंडनला रवाना झाला.
विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा गेल्या अनेक दिवसांपासून लंडनमध्ये आहे. टीम इंडियाच्या विजय परेडनंतर कोहली लंडनला रवाना झाला तेव्हा तो कायमचा तिकडे शिफ्ट झाल्याचा दावा करण्यात आला. विराटची मुंबई आणि दिल्लीतही घरं आहेत. या कपलनं काही महिन्यांपूर्वी अलिबागमध्ये एक महागडा बंगला खरेदी केला होता. त्यांच्या कुटुंबातील लोक दिल्लीत राहतात.
विराट कोहलीनं टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टी20 आंतरराष्ट्रीयमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. कोहलीसोबतच रवींद्र जडेजा आणि रोहित शर्मा यांनीही निवृत्ती घेतली. आता टीम इंडियाची जबाबदारी तरुणाईंच्या खांद्यावर असेल. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतानं शुबमन गिलला कर्णधार बनवलं आहे. यानंतर टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी हार्दिक पांड्या किंवा केएल राहुल यांना कर्णधार बनवलं जाऊ शकतं.
महत्त्वाच्या बातम्या –
युसूफ पठाणची झंझावाती खेळी व्यर्थ, ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा दारूण पराभव
डेव्हिड वॉर्नरला निवृत्ती मागे घ्यायची आहे? सूचक इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाचं नेतृत्व कोण करणार? या 2 खेळाडूंची नावं चर्चेत