जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक तसेच इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार असलेल्या बेन स्टोक्सने सोमवारी (१८ जुलै) वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. १९ जुलै रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डरहॅम येथे तो आपला अखेरचा सामना खेळेल. त्याच्या या निर्णयाने क्रिकेटजगतात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज व माजी कर्णधार विराट कोहली यानेही त्याच्या या निर्णयानंतर आपली प्रतिक्रिया दिली.
स्टोक्स हा जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो. मात्र, तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सातत्याने खेळण्यासाठी आपले शरीर साथ देत नसल्याचे म्हणत त्याने वनडेतून निवृत्ती जाहीर केली. यापुढे कसोटी व टी२० क्रिकेटमध्ये आपण असेच योगदान देत राहू असा शब्दही त्याने दिला. त्याच्या या निर्णयानंतर त्याच्या सहकारी खेळाडूंनी तसेच इतर देशांच्या खेळाडूंनी देखील त्याचे कौतुक केले. यामध्ये विराटचा ही समावेश आहे.
काय म्हणाला विराट
स्टोक्सने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून २०१९ विश्वचषकातील छायाचित्र आणि आपल्या निवृत्तीचे पत्र शेअर केले. त्याच्या याच इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट करत विराटने आपली प्रतिक्रिया दिली. त्याने लिहिले,
https://www.instagram.com/p/CgJuAELj927/?igshid=YmMyMTA2M2Y=
“मी आजवर खेळलेला सर्वात कडवा प्रतिस्पर्धी आहेस तू. रिस्पेक्ट”
या कारणाने घेतली निवृत्ती
सध्या ३१ वर्षाचा असलेला बेन स्टोक्स इंग्लंडकडून १०४ वनडे सामने खेळला आहे. सातत्याने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळत असल्याने शरीर साथ देत नसल्याचे कारण त्याने निवृत्त होताना सांगितले. स्टोक्सने वनडेमध्ये इंग्लंडसाठी सुमारे २९१९ धावा केल्या आहेत. २०१९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत त्याने नाबाद ८४ धावा करून इंग्लंडला विश्वचषक जिंकवून दिला होता. जो रुटने इंग्लंडच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर मे महिन्यात स्टोक्सची कसोटी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली गेली. त्याच्या नेतृत्वात इंग्लंडने एकही कसोटी गमावली नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हरभजनची ‘सेकंड इनिंग’ सुरू! घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ
हा शुद्ध वेडेपणा! शतक पूर्ण होताच रिषभ पंतने इंग्लंडच्या गोलंदाजांना धरलं धारेवर, पाहा व्हिडिओ