---Advertisement---

कोहलीची खिलाडूवृत्ती! स्मिथची निंदा करण्याऐवजी चाहत्यांना सांगितले कौतुक करा, पहा व्हिडिओ

On: सोमवार, जून 10, 2019 10:31 AM
---Advertisement---

लंडन। रविवारी(9 जून) 2019 विश्वचषकातील 14 वा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडला. हा सामना भारताने 36 धावांनी जिंकत या विश्वचषकातील सलग दुसरा विजय मिळवला. त्याचबरोबर या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने स्टिव्ह स्मिथसाठी दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचे सर्वांनी कौतुक केले आहे.

झाले असे की भारतीय संघाकडून विराट फलंदाजी करत असताना एका वेळी स्मिथ बाउंड्री लाईनजवळ क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी चाहत्यांकडून स्मिथची ‘चिटर, चिटर; असे म्हणत निंदा केली जात होती.

ते पाहून संतापलेल्या विराटने व्हॉक्सहॉल एन्डला मोठ्याप्रमाणात उपस्थित असणाऱ्या भारतीय चाहत्यांच्या दिशेने टाळ्या वाजवण्यासारखे हातवारे करुन स्मिथची निंदा करण्याऐवजी त्याचे कौतुक करण्यास सांगितले.

विराटची ही खिलाडूवृत्ती पाहून स्मिथनेही विराट जवळ येऊन त्याच्याशी हात मिळवला.

स्मिथ आणि त्याचा संघ सहकारी डेव्हिड वॉर्नर मागील वर्षी मार्चमध्ये चेंडू छेडछाड प्रकरणात दोषी आढळले होते. त्यामुळे त्यांच्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 1 वर्षांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी बंदी घातली होती. पण त्यांची ही बंदी मार्च 2019मध्ये संपली असल्याने या दोघांनीही 2019 विश्वचषकातून ऑस्ट्रेलिया संघात पूनरागम केले आहे.

मात्र या दोघांनाही बंदीची शिक्षा पूर्ण केल्यानंतरही चाहत्यांकडून होत असलेल्या निंदेला सामोरे जावे लागत आहे. भारताविरुद्धच्या सामन्याआधीही स्मिथ आणि वॉर्नरची चाहत्यांनी चेंडू छेडछाड प्रकरणामुळे खिल्ली उडवली आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

‘लाल मातीचा बादशहा’ राफेल नदालने जिंकले १२ व्यांदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद

विश्वचषक २०१९:…आणि बुमराहच्या बॉलवर डेव्हिड वॉर्नर आउट होता होता वाचला!

टॉप ५: शिखर धवनने शतकी खेळीबरोबरच केले हे खास ५ विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment